Nuksan Bharpai : खरीप हंगामात 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील 6 लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यात अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा इतर जिल्ह्यांचा समावेश आहे.

2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय
खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Nuksan Bharpai) झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते. याबाबतच महत्त्वाचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यता : सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या कालावधीतील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये या कारणामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडून 733 कुटी 45 लाख 85 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यता: सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या कालावधीतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान (Nuksan Bharpai) भरपाई जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे.
हे वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज
पुणे आणि पालघर साठी
- शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान (Nuksan Bharpai) भरपाई दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 109 शेतकऱ्यांना 3 लाख दोन हजार रुपये
- पालघर जिल्ह्यातील 2730 शेतकऱ्यांना 9 कोटी 67 लाख रुपये
- रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांना तीन लाख 25 हजार रुपये
- तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 1 लाख 21 हजार रुपये
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी
- अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात 155 अतिवृष्टी नुकसान (Nuksan Bharpai) भरपाई शेतकऱ्यांना 89 लाख 17 हजार रुपये
- अकोला जिल्ह्यातील 14706 शेतकऱ्यांना 22 कोटी 73 लाख रुपये.
- यवतमाळ जिल्ह्यातील 925 बाधित शेतकऱ्यांना 48 लाख रुपये
- बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार 296 शेतकऱ्यांना 300 कोटी 35 लाख रुपये तर
- वाशिम जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांना 47 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई पुणे आणि नाशिक विभागासाठी
- पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील (Nuksan Bharpai) 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये.
- सांगली जिल्ह्यातील 18 हजार 199 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी पाच लाख रुपये.
- पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना 2 कोटी 60 लाख रुपये.
- तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 16 बाधित शेतकऱ्यांना 1 लाख रुपये
- धुळे जिल्ह्यातील 1541 बाधित शेतकऱ्यांना 93 लाख रुपये.
- नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये.
- जळगाव जिल्ह्यातील 1540 बाधित शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये.
- तर अहमदनगर जिल्ह्यातील 1224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नागपूर विभागासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई
- नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील 12970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 76 लाख रुपये
- नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपये
- नागपूर जिल्ह्यातील तीन हजार 933 बाधित शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 84 लाख रुपये
- तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2685 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
असे एकूण राज्यात सहा लाख 43 हजार 542 बाधित शेतकऱ्यांसाठी 733 कोटी 45 लाख रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती पुन्हा सुरळीत करण्यात मदत होईल आणि नुकसानाची भरपाई होईल. Nuksan Bharpai
1 thought on “Nuksan Bharpai :उर्वरित शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर! कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान?”