शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात. pik vima watap

pik vima watap शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान-आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत मिळणारी पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी ११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे.

विमा वितरण होणार तीन टप्प्यांत pik vima watap

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे पीक विम्याचे वितरण अधिक पारदर्शक आणि नियमित होईल. आतापर्यंत अनेकदा विम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वाट पाहावी लागत होती. मात्र, आता प्रत्येक हंगामातील पीक विम्याची रक्कम तीन टप्प्यांत विभागून वर्षातून तीन वेळा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

पहिला हप्ता ११ ऑगस्ट रोजी

या नवीन प्रणालीचा पहिला टप्पा ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता राजस्थानमधील झुनझुनू येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २०२४-२५ च्या रब्बी हंगामातील आणि त्यापूर्वीच्या प्रलंबित हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्रातील शेतकरीही होणार सहभागी

या महत्त्वाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शेतकरीही सहभागी होणार आहेत. कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका स्तरावरही शेतकऱ्यांसाठी व्हर्च्युअल सहभागाची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या नव्या निर्णयामुळे पीक विम्यासाठीची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून, त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a comment