महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना Maharashtra pink e rickshaw yojana Marathi

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना Maharashtra pink e rickshaw yojana Marathi

महाराष्ट्र पिंक- ई रिक्षा योजना 2024 Maharashtra pink e rickshaw yojana Marathi

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना ही योजना 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेचा दहा शहरांमधील महिलांना लाभ घेता येणार आहे. गुलाबी रिक्षा ही योजना केवळ फक्त महिलांसाठी आहे ज्या  महिलांची परिस्थिती खूप गरीब आहे. अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल जेणेकरून त्या महिलांना आपल्या कुटुंबातील. मुला मुलींचे पालन पोषण करण्यासाठी आर्थिक मदत होईल.

महाराष्ट्र पिंक ई -रिक्षा योजना मराठी Maharashtra pink e rickshaw yojana Marathi

महाराष्ट्र सरकारने ही योजना 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे.

या योजनेचा लाभ हा दहा प्रमुख शहरांमध्ये  दिला जाणार आहे . या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षासाठी 5000 गुलाबी रिक्षा दिले जाणार आहे. आणि याचा लाभ हा बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार  20% (Subsidy )अनुदान देईल, आणि अर्जदार महिलेला 10% खर्च महिलेला करावा लागेल. तर उर्वरित 70 % (loan)बँक कर्जद्वारे कव्हर केले जाईल. तर या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल, यात पात्रता कोण असेल, फायदे काय आहेत, अर्ज कसा करायचा याची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

महाराष्ट्र पिंक- ई रिक्षा योजना 2024 maharashtra pink e rickshaw yojana marathi

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना

योजनेचे नाव

महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजना

विभाग

महिला व बाल विभाग

 राज्य

महाराष्ट्र

 लाभार्थी

 महाराष्ट्र राज्यातील महिला

लाभ

 20 टक्के अनुदान

 उद्देश

बेरोजगार महिला व गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे .

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा उद्देश

महाराष्ट्र पिंक ई -रिक्षा ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना महिलांना दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही याकरिता महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केलेली आहे.  ही योजना महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये  सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून बेरोजगार महिलांना 20% अनुदान दिली जाईल. या योजनेचा असा उद्देश आहे की बेरोजगार महिलांना एक रोजगाराची चांगली संधी मिळेल.

महाराष्ट्र पिंक ई - रिक्षा योजनेचे फायदे

  • ही योजना महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र पिंक- ई रिक्षा योजना 2024 या योजनेअंतर्गत मोठ्या मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी याचा फायदा होईल.
  •  पिंक ई -रिक्षा महिला चालवतील.
  •  या योजनेचा लाभ हा मोठ्या शहरांमधील बेरोजगार महिलांना दिला जाईल.
  •  या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना 20 टक्के Subsidy  अनुदान सरकारकडून देण्यात येईल .
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर उर्वरित 70 टक्के (Bank Loan) रक्कम बँक कर्जाद्वारे कव्हर केली जाईल.
  • महाराष्ट्र पिंक- ई रिक्षा योजना 2024 महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे यांनी पहिल्या वर्षी 5000 गुलाबी  रिक्षांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना अनुदान महाराष्ट्र पिंक- ई रिक्षा योजना 2024

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना रिक्षाच्या किमतीच्या फक्त 10% रक्कम ही अर्जदार महिलेला भरावी लागेल. तर उर्वरित 70 % बँक कर्जाद्वारे कव्हर केली जाईल आणि 20% टक्के अनुदान हे रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून दिले जाईल.

ही योजना राज्यातील दहा शहरांमध्ये राबवली जाणार आहे.

महाराष्ट्रातील या दहा शहरांमध्ये पिंक ई -रिक्षा ही योजना सुरू करण्यात येणार आहे

  •  मुंबई शहर
  • नागपूर
  •  पुणे
  •  पनवेल
  • पिंपरी चिंचवड
  •  छत्रपती संभाजी नगर
  • नाशिक
  •  थाईन
  •   मुंबई उपनगर
  •  नवी मुंबई.

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना पात्रता

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेचा लाभ महिलांना दिला जाईल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत  पाहिजे
  •  पिंक ई – रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाची वय 21 ते 60 दरम्यान असावे.
  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना अर्ज करण्याची पद्धत

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ही योजना 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा आत्ताच केली असल्यामुळे या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया अजून आलेली नाही. ज्यावेळेस सरकारकडून अर्ज प्रक्रिया सुरू होताच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे लवकरच अपडेट देण्याचा प्रयत्न करू.

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना 2024 विचारले जाणारे प्रश्न

  1. महाराष्ट्र पिंक – ई रिक्षा योजनेचा लाभ किती शहरांमध्ये दिला जाणार आहे?
  •  या योजनेचा लाभ 10 शहरांमध्ये दिला जाणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर, पनवेल, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्ये दिला जाईल.
  1. या योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाईल?
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 20 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाईल आणि दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना भरावी लागेल. तर उर्वरित70 टक्के बँक  कर्जद्वारे कव्हर केली जाईल  .
  1. या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
  •  या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जाणार आहे.
  1. पिंक ई -रिक्षा योजनेसाठी कोण पात्रता असेल?
  •  पिंक ई -रिक्षा योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी महिला पात्र असतील.

Leave a comment