महिला सन्मान योजना महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत.

महिला सन्मान योजना

महिला सन्मान योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या राज्यामध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त योजना या महिलांसाठी, मुलींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, नवजात बालके, शालेय विद्यार्थी या सर्वांसाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार ही वेगवेगळे योजना राबवत असते. तसेच आपण आज महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणारे योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे महिला सन्मान योजना महाराष्ट्र ही योजना महाराष्ट्र (Budget) अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांसाठी एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यात सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये तिकीट दरक 50% सवलत दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला पन्नास टक्के दरात प्रवास करू शकतात.

महिला सन्मान योजना

या राज्यामध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त योजना या महिलांसाठी, मुलींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, नवजात बालके, शालेय विद्यार्थी या सर्वांसाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार ही वेगवेगळे योजना राबवत असते. तसेच आपण आज महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणारे योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे महिला सन्मान योजना महाराष्ट्र ही योजना महाराष्ट्र अर्थसंकल्प(Budget 2023-2024 ) 2023 मध्ये महिलांसाठी एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यात सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये तिकीट दरक 50% सवलत (Discount) दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला पन्नास टक्के दरात प्रवास करू शकतात.

2023 – 24 (Budget) अर्थसंकल्पनामध्ये महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास तिकिटामध्ये ही सवलत लागू करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा 17 मार्च 2023 पासून महिलांना राज्याच्या बॉर्डर पर्यंत प्रवास भाड्यामध्ये सूट देण्याचे मान्य केले.

महिला सन्मान योजनेची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे या योजनेसाठी पात्रता कोण आहे ,या योजनेसाठी लाभ काय आहे, अर्ज करण्याची पद्धत ,ही योजना कधी सुरू करण्यात आली, या सर्वांची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे तुम्ही हा लेख सर्व वाचावा आणि हा लेख सर्वांपर्यंत शेअर करावा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल आणि 50 टक्के सवलत मिळवून मोफत प्रवास करू शकतील.

योजनेचे नाव

महिला सन्मान योजना महाराष्ट्र

विभाग

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

  योजनेची सुरुवात

 17 मार्च 2023 महाराष्ट

लाभ

महाराष्ट्र राज्यातील महिलांना एसटी च्या तिकिटा दरात 50 टक्के सवलत दिली जाते.

उद्देश

महिलांचा  आर्थिक विकास करणे

अर्ज करण्याची पद्धत

  या योजनेचा लाभ घेण्या साठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

महिला सन्मान योजना उद्देश

 • महाराष्ट्र राज्यातील महिलांना तसेच सर्व नागरिकांना एसटी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे तसेच प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिला सन्मान योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 •  महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलाचे जीवनमान सुधारणे असा या योजनेचा उद्देश आहे.
 • महिलांना रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडाफारसा विरंगळ मिळावा असा या योजनेचा उद्देश आहे.महिला सन्मान योजना ची वैशिष्ट् महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% तिकीट सूट दरामध्ये दिल्याने सवलती मध्ये प्रवास करता येणार आहे.
 • महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे

स्वातंत्र्य व आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे.

 • महिला सन्मान योजनेमुळे महिलांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे.
 •  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. की या योजनेमध्ये सर्व जाती – धर्माच्या महिलांना 50% सवलत दरात प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नाही

महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना पुढील गाड्यांमध्ये सवलत दिली जाणार आहे

या योजनेअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलत लागू करण्यात आलेली आहे. त्या गाड्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे.

 • साधी बस
 • रात राणी
 • मिनी
 • निमआराम
 • विनावातानुकूलीत शयन – आसनी
 • शिवशाही (आसनी)
 • शिवनेरी
 • शिवाई (साधी आणि वाता नुकुलीत)

तसेच भविष्यात पुढे च्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये देखील ही सवलत मिळणार आहे.

महिला सन्मान योजना

महिला सन्मान योजना 50% सवलती बाबत निर्देश प्राप्त झाले त्यानुसार पुढील सूचना देण्यात आलेले आहेत

 •  सर्व महिलांना परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलती दिनांक 17 मार्च 2013 पासून देण्याचा निर्णय करण्यात आला.
 •  ही योजना भविष्यात राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यामध्ये ज्या काही नवीन बसेस येतील त्या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
 •  महिला सन्मान योजना या नावाने सदर योजना ही संबोधण्यात येत आहे.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी सवलत ही सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हदेपर्यंतच राहील.
 •  ही योजना 65 ते 75 वयाच्या  गटातील महिलांना उपलब्ध राहील.
 •  महिला सन्मान योजना ही पाच ते बारा वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणे 50% सवलत चालू राहील.
 •  75 वर्षावरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजने अंतर्गत सूचनेनुसार शंभर टक्के सवलत अनुज्ञय राहील.
 •  ज्या आगाऊ आरक्षण तिकीट घेतलेल्या महिला आहेत, अशा महिलांना 50 टक्के सवलतीचा परताव मिळणार नाही.
 •  राज्यातील ज्या महिला प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा द्वारे, विंडो बुकिंग द्वारे मोबाईल ॲप द्वारे, ऑनलाइन, आरक्षणासाठी तिकीट घेतली, अशा प्रवाशांकडूनप्रति सेवा प्रकारानुसार लागू असलेल्या आरक्षण आकार वसूल करण्यात येईल.

 

महिला सन्मान योजना लाभार्थी

 • महिला सन्मान योजनेचे लाभार्थी राज्यातील सर्व जाती धर्मातील महिला या योजनेसाठी लाभार्थी आहे.

महिला सन्मान योजनेचे फायदे

 •  महिला सन्मान योजनेमध्ये राज्यातील सर्व महिलांना 50% सवलत दरात एसटीच्या सर्व बसेस मध्ये प्रवास राज्यात कुठे पण करता येणार आहे.
 •  या योजनेमुळे राज्यातील महिलांना सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.
 •  राज्यातील महिला स्वातंत्र्य आत्मनिर्भर या योजनेमुळे बनतील.
 •  महिला सन्मान योजना चा महिलाचे जीवन सुधारण्यासाठी हातभार होईल.
 •  या योजनेअंतर्गत राज्यातील महिला स्वातंत्रपणे जगण्यास व इतर एसटीने प्रवास करण्यास प्रोत्साहित होतील.
 •  महिलांना बसेस मध्ये 50 टक्के सवलत मिळणे राज्यभर प्रवास करू शकतील.

महिला सन्मान योजना पात्रता

 • महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असली पाहिजे. तरच ती महिला या योजनेसाठी पात्र असेल.

महिला सन्मान योजनेची अटी व नियम

 •  महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांना दिला जाईल.
 •  महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना महिला सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • महिला सन्मान या योजनेअंतर्गत महिलांना महाराष्ट्र राज्य बाहेर प्रवास करता येणार नाही.
 •  75 वय वर्षावरील महिलांना 100% तिकीट दरामध्ये सवलत दिली जाईल.
 • महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील, प्रवर्गातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • शहरी वाहतुकीसाठी महिला सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 •  महिलांना दहा टक्के सवलत एसटीमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत दिली जाणार नाही, तिकीटाची किमान 50 टक्के रक्कम भरणे सर्व महिलांना बंधनकारक आहे

महिला सन्मान योजनेची आवश्यक कागदपत्रे

 • महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना कोणत्याही आवश्यक कागदपत्राची गरज नाही.
 • जर महिला 75 वर्षांवरील असेल तर त्या महिलेला तिचे आधार कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रवासादरम्यान सोबत आणणे बंधनकारक आहे.

Leave a comment