महिला सन्मान बचत योजना मराठी

महिला सन्मान बचत योजना मराठी mahila bachat patr

आपण आज या लेखांमध्ये महिला सन्मान बचत योजना मराठी या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या राज्यामध्ये महिलांसाठी खूप सारे योजना राबवल्या जातात जास्तीत जास्त योजना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या असतात तर आपण आज अशाच एक योजनेची माहिती पाहणार आहोत जी योजना 2023 या आर्थिक वर्षांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी महिला सन्मान बचत योजना राबविण्यात येत आहे. ही योजना म्हणजे महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे चला तर आपण आज या योजनेमध्ये पात्रता कोण आहे, आवश्यक लागणारे कागदपत्रे , उद्देश काय आहे ,लाभ किती आहे ,या योजनेचा फायदा काय हे सर्व या योजनेमध्ये खालील प्रमाणे पाहूया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महिला सन्मान बचत योजना मराठी mahila bachat patr

महिला सन्मान बचत योजना मराठी

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना माहिती

 महिला सन्मान बचत योजना मराठी भारत सरकारची नवीन सेविंग स्कीम आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जाईल . या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1000 हजार रुपयांपासून ते 2 लाख पर्यंत गुंतवणूक करता येईल. ही योजना एप्रिल 2023 ते मार्च 2025 या दोन वर्षाच्या कालावधी पर्यंतच लागू असेल. त्यानंतर लाभार्थी व्यक्तीला ठेवलेल्या रकमेवर या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 7.5% दराने व्याज मिळेल. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त महिलांना होणार आहे महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेची सुरुवात एक फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी २०२३ २४ च्या अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत पत्र योजना ही राबविण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ हा देशातील सर्व महिलांना घेण्यात येईल.

महिला सन्मान बचत योजना मराठी mahila bachat patr

महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये

 •  2023 मध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
 •  या योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये ते दोन लाख पर्यंत आहे.
 •  या योजनेचा गुंतवणुकीचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे.
 • महिला सन्मान बचत पत्र योजनेचा व्याजदर सरकारकडून हा 5 टक्के इतका आहे.
 •  या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
 •   महिला सन्मान बचत योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळेल.
 •  या योजनेअंतर्गत महिलांना जमा रकमेवर सरकारकडून आयकर टॅक्स मधून सुटका मिळणार आहे.
 •  महिला सन्मान बचत योजनेमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर  योजनेच्या तुलनेत तुम्हाला चांगले व्याज व लवकर लाभ मिळेल.
 • महिला सन्मान बचत योजनेमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर बचत योजनेच्या तुलनेत तुम्हाला चांगले व्याज व लवकरच लाभ मिळेल.

महिला सन्मान बचत पत्र योजना तपशील

 • महिला सन्मान बचत योजनांमध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये रक्कम आहे.
 •  महिला सन्मान बचत योजनांमध्ये महिलांना 1 हजार रुपये पासून ते 2 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येईल.
 • या योजनेअंतर्गत महिलांना गुंतवणुकीवर 5 टक्के व्याजदर मिळेल.
 • या योजनेसाठी गुंतवणुकीचा कालावधी हा 2 वर्षाचा आहे.
 • या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशावर सरकार महिलांना आयकर टॅक्स मधून सुटका देणार आहे.
 • जमा रकमेच्या 40% आंशिक पैसे काढण्यास देखील सक्षम असतील

महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर

     महिला सन्मान बचत योजनेमध्ये महिलांना 1000 हजार रुपये पासून ते दोन लाखापर्यंत गुंतवणूक करता येईल.

   या योजनेचा कालावधी दोन वर्षाचा आहे.दोन वर्षाच्या कालावधीसाठी 2 लाख पर्यंतच्या ठेवीवर 7. 5% वार्षिक व्याज दर लागू आहे .

उदाहरणार्थ: तुम्ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेमध्ये 2 लाख रुपये गुंतवले आहेत. तर तुम्हाला या योजनेमध्ये पहिल्या व वर्षांमध्ये वार्षिक 7.5% व्याजानुसार व्याजाची रक्कम ही 15,427 रुपये इतकी असेल. तर, पहिल्या वर्षी जमा झालेली रक्कम ही रू 2,15,427 इतकी असेल . आणि दुसऱ्या वर्षीच्या शेवटी व्याजाची रक्कम ही 16,617 रू इतकी असेल . अशाप्रकारे दोन वर्षाच्या शेवटी म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळ तुम्हाला मिळालेली रक्कम ही 2,32,044 असेल.

2,00,000 (गुंतवणूक)+32044(दोन वर्षासाठी मिळालेले व्याज)=232044(एकूण रक्कम)

महिला सन्मान बचत योजनेतील पैसे काढण्याचे नियम

 • या योजनेमध्ये गुंतवणूकदार खाते उघडून एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत संपण्या आधी एकूण जमा रकमेच्या 40% रक्कम काढून शकतो. पण ही रक्कम फक्त एकदाच काढता येते.
 • या योजनेमधून मॅच्युरिटी संपण्याआधी पैशाची गरज असेल तर त्यासाठीही खाते लाभार्थ्याला संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत विनंती अर्ज करावा लागेल.
 • या योजनेमध्ये लाभार्थी गुंतवणुकीदराचा जर मृत्यू झाला असेल तरच तुम्ही ते खाते मुदतीपूर्वी पूर्णपणे बंद करू शकतात.
 • योजनेअंतर्गत मुलीच्या मृत्यूनंतर किंवा गंभीर आजार किंवा तिच्या पालकाचा मृत्यू  झाल्यास खाते मॅच्युरिटीच्या कालावधी पूर्ण बंद केले जाऊ शकते. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यावर पालकाला खात्यातील उर्वरित रक्कम आणि मृत्यूच्या तारखेपर्यंत रक्कम त्यावरील व्याजाची रक्कम दिली जाईल.

महिला सन्मान बचत योजना मराठी पात्रता mahila bachat patr

 • महिला  सन्मान बचत योजनेसाठी अर्ज महिला किंवा मुली दोन्ही पण करू शकतात.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • सन्मान बचत पत्र योजनेसाठी कोणतेही वयोगटातील महिला किंवा मुली या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचे फायदे

     या योजनेअंतर्गत देशातील महिलांना किंवा मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिला असो किंवा मुली असो त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यामध्ये एक हजार रुपये गुंतवणूक  करण्या पासून ते दोन लाखापर्यंत केली जाऊ शकते. आणि त्यासाठी प्रति वर्ष 7.5% दराने त्याच्यावरती व्याजदर दिला जाणार आहे. या  सरकारच्या योजनेचा महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. महिलांना पुढे चालून कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

महिला सन्मान बचत पत्र योजनेची आवश्यक कागदपत्रे

 •  लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
 • पॅन कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 •  पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • ई-मेल आयडी
 •  बँक खाते

वरील दिलेले सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

       महिला सन्मान बचत पत्र योजनाही 2023 या आर्थिक वर्षांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी राबवून. महिलांना गुंतवणुकीची संधी दिलेली आहे. परंतु या योजनेसंबंधी कोणतीही अधिक सूचना केंद्र सरकारकडून आलेली नाही. अर्ज कसा करायचा हे अजूनही केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. आम्ही तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र योजना अर्ज प्रक्रिया सांगू शकत नाही. महिला सन्मान बचत पत्र योजना ही आत्ताच लागू झालेली आहे त्यासाठी या योजनेची अर्ज करण्याच्या पद्धतीसाठी काही काळ वाट पाहावी लागेल. त्यामुळे महिला सन्मान बचत पत्र योजना अर्ज करण्याची प्रक्रिया आम्ही सांगू शकत नाही.

     महिला सन्मान बचत योजना ची  अर्ज प्रक्रिया भारत सरकारकडून सुरू होताच आम्ही या लेखाद्वारे माहिती अपडेट करू.

धन्यवाद!

महिला सन्मान बचत योजना मराठी mahila bachat patr

 

विचारले जाणारे प्रश्न

 1. महिला सन्मान बचत पत्र योजना केव्हा सुरू झाली?
 •  महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2023-24 मध्ये सुरू झाली.
 1. या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
 •  या योजनेचा लाभ देशातील महिलांना व मुलींना दिला जाईल.
 1. महिला सन्मान बचत पत्र या योजनेचा कालावधी किती वर्षाचा आहे?
 •  महिला सन्मान बचत पत्र या योजनेचा कालावधी फक्त 2 वर्ष म्हणजे एप्रिल 2023 ते मार्च 2025 पर्यंतचा आहे.
 1. महिला सन्मान बचत योजनेचे व्याजदर काय आहे?
 •  महिला सन्मान बचत पत्र या योजनेचा प्रति वर्ष 7.5% व्याजदर आहे
 1. या योजनेमध्ये सुरुवातीला गुंतवणूक किती करावी लागते?
 •  या योजनेमध्ये सुरुवातीला गुंतवणूक 1000 रुपये इतकी करावी लागते.
 1. महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा कोणी केलेली आहे?
 •  महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केलेली आहे.

Leave a comment