Plastic Mulching Anudan Yojana 2024 राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून फळझाडांना पालेभाज्या पिकासाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारे प्लास्टिक फिल्म यावर अनुदान दिले जात आहे.
पिकामध्ये मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीमधील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते पिकांमध्ये तणांची वाढ देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेत असताना खूप उपयुक्त ठरतो जाणून घेऊया या सविस्तर माहिती. Plastic Mulching Anudan Yojana 2024
Plastic Mulching Anudan Yojana 2024 किती अनुदान मिळते ?
- अनुदान हे सर्वसाधारणपणे प्रति हेक्टर रुपये 32000 असून या खर्चाच्या 50% म्हणजे जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान दिले जाते
- जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्टरी 36000 रुपये दिले जाणार आहेत या खर्चाच्या 50 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 184 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादित साठी देणे बंधनकारक असणार आहे Plastic Mulching Anudan Yojana 2024
हे वाचा: सोयाबीन खरेदीत12 वरून 15 टक्के ओलाव्याचा निकष
कोणाला मिळणार लाभ ?
- शेतकरी
- बचत गट
- शेतकरी उत्पादक कंपनी
- शेतकरी समूह
- सरकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसाहाय्य घेऊ शकतात
Plastic Mulching Anudan Yojana 2024 कागदपत्रे :
- आधार कार्ड झेरॉक्स
- आधार संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील
- सातबारा उतारा
- आठ अ प्रमाणपत्र
Plastic Mulching Anudan Yojana 2024 कुठे करावा अर्ज ?
- Plastic Mulching Anudan Yojana 2024 या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल या योजनेची अधिक माहिती त्यांच्याकडून तुम्हाला व्यवस्थित दिली जाणार आहे.
- विविध पिकांसाठी किती जाडीची आणि कोणती प्लास्टिक फिल्म वापरावे ?
- ज्या पिकांना 11 ते 12 महिने कालावधी लागतो म्हणजे उदाहरणार्थ पपई यासारख्या फळपिकांसाठी 50 मायक्रोन जाडीची युवी प्लास्टिक फिल्म वापरणे उपयुक्त आहे
- तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांसाठी म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला आणि स्ट्रॉबेरी आशा फळपिकांसाठी 25 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरणे उपयुक्त ठरते
- जास्त कालावधी लागणारे पीक म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी ज्या पिकांना लागतो या सर्व पिकांसाठी 100 किंवा 200 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरणे अतिशय उपयुक्त ठरते.
1 thought on “या शेतकऱ्यांना मिळणार प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ ; पहा कोणते शेतकरी होणार पात्र ? Plastic Mulching Anudan Yojana 2024”