PM Awas Subsidy :घरकुल अनुदानात 50 हजार रुपयांची झाली वाढ…! सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…

PM Awas Subsidy : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते .या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. मागील सात वर्षापासून या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेक नागरिक नाराज होते. सध्या महागाईच्या काळामध्ये हे अनुदान पुरेसे होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जास्त मदत मिळेल.घरकुल लाभार्थ्यांना 50000 रुपये वाढीव अनुदान दिले जाणार असून, त्यापैकी 35 हजार रुपये घरकुल बांधण्यासाठी असतील आणि 15 हजार रुपये हे पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा उभारणी करण्यासाठी दिले जाणार आहे. मात्र, सौर ऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना हे 15 हजार रुपये अनुदान दिले जाणार नाही.PM Awas Subsidy

PM Awas Subsidy

19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील 19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट ठेवले आहेत. या योजनेचा विशेष लाभ हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागास वर्गातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : शेतकरी ओळखपत्र असेल तरच मिळणार शासकीय योजनांचा लाभ.

सर्वांसाठी घरे हा सरकारचा उद्देश

सर्वांसाठी घरे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकार वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील बेघर असणाऱ्या कुटुंबांना मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई ,शबरी,यशवंतराव चव्हाण आणि मोदी आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना मदत दिली जात आहे . या सर्व योजना ग्रामीण विकास विभागामार्फत अमलात आणल्या जात आहे .PM Awas Subsidy

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान किती?

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मूळ अनुदान हे 1लाख 20 हजार रुपये,तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 दिवसाच्या मजुरी पोटी 27 हजार रुपयांचे अनुदान आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये दिले जातात .आता घरकुल लाभार्थ्यांना ग्रामीण विकास विभागाच्या निर्णयानुसार 50 हजार रुपये वाढीव अनुदान दिले जाणार आहे तर आता असे मिळून प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना 2 लाख 9 हजार रुपये अनुदान मिळतील . PM Awas Subsidy

Leave a comment

Close VISIT MN CORNERS