pm awas survey : घरकुल सर्वे सुरू..! असा करा ऑनलाईन सर्व!

pm awas survey ग्रामीण भागातील नागरिकांच्या पक्या घराचे सप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तत्परतेने कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जे नागरिक अजूनही झोपडीत कच्च्या भिंतीच्या घरात किंवा गवताचे छपरा खाली राहतात आणि त्यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. अशा नागरिकांसाठी सरकार घर बांधण्यासाठी अनुदान वितरित करत आहे. या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पात्रता यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. पात्रता यादीमध्ये ज्या नागरिकांची नाव समाविष्ट आहेत त्यास नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

प्रपत्र ड अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत त्याच लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. प्रपत्र ड हे राज्य शासनाने सर्वेक्षण करून निवड केल्या लाभार्थ्यांची यादी असते. यापूर्वी सर्वेक्षण 2018 मध्ये पूर्ण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामधून अनेक नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ सरकारकडून वाटप करण्यात आला आहे. परंतु वाढती लोकसंख्या आणि वाढती घरकुलाची मागणी याचा विचार करता राज्य शासनाने परत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pm awas survey या नवीन सर्वेक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना ज्यांना या आधीच्या यादीमध्ये समाविष्ट होत आले नाही अशा नागरिकांना आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. सरकारच्या या नवीन संधीमुळे योजनेपासून वंचित राहिलेला लाभार्थ्यांना नक्कीच लाभ प्राप्त होईल. ग्रामीण भागातील जे नागरिक घरकुल योजनेसाठी पात्र असतील त्यांनी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपली नाव नोंदणी करून घ्यावी. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्जाची आणि आपल्या सर्वांच तपासणी केली जाते व तपासणी दरम्यान आपण घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला घरकुल अनुदान वाटप केले जाते.

pm awas survey प्रधान मंत्री आवास योजनेचे महत्व…

भारत सरकारने सुरू केली प्रधानमंत्री आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना मानली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व कर्ज व्यक्तींना घर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. या सरकारच्या योजनेच्या माध्यमातून अनेक गरिबांचे आपले स्वतःचे हक्काचे पक्के बांधण्याचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेच्या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे.

आवास सर्वे सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोणताही पात्रता लाभार्थी वंचित राहणार नाही हा शासनाचा मूळ हेतू आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या किंवा स्थानिक राजकारणाचा प्रभाव होऊन अनेक पात्र लाभार्थ्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये अनेक पात्र असणारे लाभार्थी योजनेमधून वंचित राहतात. असे लाभार्थी योजनेमधून वंचित राहू नये यासाठी शासनाने परत सर्वे करून नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आवास सर्वे म्हणजे काय?

बहुतांश सरकारच्या योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ वितरित होत नाही ज्यामधून अनेक लाभार्थी योजनेचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहतात. सरकारच्या या पीएम आवास सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र असून देखील त्यांना लाभ मिळाला नाही अशा नागरिकांना लाभ देण्यासाठी हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे. या सर्व च्या माध्यमातून आपल्या घराची आपल्या उत्पन्नाची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती एकत्र करून. आपण योजनेसाठी जर पात्र असाल तर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी. प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपले नाव प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केले जाते. प्रपत्र ड मधील सर्व लाभार्थ्यांची शासनाकडून फेर तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. तपासणी दरम्यान अपात्र लाभार्थी या यादी मधून वगळले जातात. पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी पुढे घरकुल योजनेसाठी पात्र ठरवली जाते. त्यानंतर मिळणाऱ्या टार्गेट नुसार आणि इतर प्राधान्यक्रमानुसार या यादीमधील लाभार्थ्यांची निवड घरकुल साठी केली जाते. यामध्ये प्राधान्य क्रमानुसार निवड केली जाते ज्यामध्ये विधवा महिला असतील अपंग व्यक्ती असतील अनाथ असतील अशा व्यक्तींना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिले जाते.

सर्वे कसा होणार

हा सर्वे ऑनलाइन पद्धतीने केला जात आहे. हा सर्वे पूर्ण करण्यासाठी दोन प्रक्रिया देण्यात आले आहेत. यामध्ये एक तुमच्या गावचे ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांच्या माध्यमातून हा सर्वे पूर्ण केला जातो. यामध्ये अनेक अडचणी आणि राजकारण याच्या माध्यमातून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासनाने सेल्फ सर्वे म्हणजे स्वतःचाच सर्वे स्वतः करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्वे च्या माध्यमातून आपण आपले नाव आपल्या गावच्या प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट करू शकता.

आवास सर्वे हा घरकुल सर्वे ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पूर्ण होणार असला तरी देखील आपण स्वतः देखील आपला सर्वे ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतो. आपण स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील आपल्या घराचा सर्वे करू शकता. ज्यामध्ये आपल्याला आपली माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती देणे आवश्यक आहे. आपल्या जुन्या घराचा तपशील जुन्या घराचे फोटो. त्यासोबतच आपल्याला पात्रता निकषांमध्ये बसणारे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाचे उत्तर देखील या सर्व दरम्यान आपल्याला द्यावे लागणार आहेत. घर बांधणी साठी जागा उपलब्ध आहे का त्या जागेचा फोटो देखील आपल्याला सर्वे दरम्यान घेणे आवश्यक आहे.

सेल्फ सर्वे प्रक्रिया कशी पूर्ण करायची यासाठी खालील व्हिडिओ पहा

आवास सर्वे आवश्यक अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वे करण्यासाठी कोणती माहिती आवश्यक लागते.

  • कुटुंबप्रमुखाचे आधार कार्ड
  • कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक
  • कुटुंबाचे जॉब कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्ड

एवढी माहिती ऑनलाईन पद्धतीने आवास सर्वे पूर्ण करण्यासाठी आवश्यक लागते. ज्या या माहितीच्या साह्याने आपला सर्व पूर्ण करून घ्यावा.

Leave a comment

Close VISIT MN CORNERS