pm kisan 19 hapta केंद्र शासनाच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चे अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 हजार रुपये या प्रमाणात अर्थसहाय्य वितरित केले जाते. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या 18 हप्त्या अंतर्गत 36000 हजार रुपये एवढी रक्कम प्रति शेतकरी यांना वितरित करण्यात आलेली आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांना आता 24 फेब्रुवारी रोजी 19 व्या हप्त्याचे चे देखील वितरण केले जाणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 व हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. या हप्त्याचे वितरण करण्यासाठी बिहार मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशातील सर्व शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे चे वितरण केले जाणार आहे.

कधी व किती वाजता मिळेल हप्ता pm kisan 19 hapta
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण करण्याचे नियोजन 24 फेब्रुवारी 2025 रोजी केलेले आहे. हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी दोन ते साडेतीन (02.00 -03.30 ) दरम्यान वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेता येणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता बिहारमध्ये पार पाडणाऱ्या कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने सहभागी राहणार आहे. यासोबतच राज्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक संघटना यांच्या माध्यमातून देखील हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
हे वाचा: येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करणार
pm kisan 19 hapta बिहार राज्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील पाहता येणार आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या या संकेतस्थळावरून आपल्याला हा कार्यक्रम पाहता येईल. या कार्यक्रमांमध्ये आपण तसेच आपल्या जवळील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवावा अशा सूचना देखील कृषी विभागांनी दिलेले आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in/ या लिंक चा वापर करा. pm kisan 19 hapta
2 thoughts on “pm kisan 19 hapta : किती वाजता जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता.”