PM Kisan पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करायची? 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी या स्टेप फॉलो करा

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून फेब्रुवारी/मार्च 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 19 व्या हत्याची रक्कम 2 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आली आहे.

आता शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) योजनेसाठी नवीन नोंदणी करायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीचा वापर करता येणार आहे. पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याने नोंदणी केल्यास त्यांना येणाऱ्या 20 व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.PM Kisan

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Kisan

नवीन नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल

पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 सन्मान हप्त्यामध्ये 2 हजार रुपये प्रमाणात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात.ज्या शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायचे आहे त्यांनी या योजनेच्या अटी व नियम काय आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • छोट्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • शेतकऱ्यांकडे जमीन असणे आवश्यक आहे आणि ती पण शेती करण्यासारखी असायला पाहिजे.
  • शेतकऱ्यांचे नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्ये असणं आवश्यक आहे .
  • अर्जदार शेतकऱ्यांचा आधार कार्ड ,बँक खाते आणि मोबाईल नंबर योजनेची जोडलेला असणे आवश्यक आहे .

हे वाचा : सरकारने रक्कम मंजूर करूनही शेतकऱ्यांना काय मिळाला नाही पिक विमा.

ऑनलाइन पद्धतीने नोंदणी कशी करायची

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना या योजनेच्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ वेबसाईटवर जावे लागेल .
  • त्यानंतर शेतकऱ्यांना नवीन शेतकरी नोंदणी (new farmer registration) या वर क्लिक करा.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या राज्याची निवड करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅप्चा क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल .
  • तो ओटीपी टाकून घ्यावा लागेल .
  • शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड,बँक पासबुक,जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करून घ्यावे लागतील.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल .
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल .

ऑफलाइन पद्धतीने नोंदणी कशी करता येईल?

जर तुम्हाला पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पण करू शकतात .ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन आणि अर्ज भरून द्या . त्यानंतर केंद्र वरील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल, पात्रता तप असेल आणि तुमचे कागदपत्र बरोबर आहेत का हे पण तपासून पाहिले जाईल. सर्व व्यवस्थित तपासणी केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासले जाईल , जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज जमा केला जाईल.PM Kisan

पात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ बंद पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

जर तुम्हाला कोणताही खंड न पडता पीएम किसान योजनेचा मिळावा, असं जर वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही ई केवायसी प्रक्रिया सेंटरवर किंवा पीएम किसान (PM Kisan) पोर्टलवरून पण पूर्ण करता येते.जमिनीची पडताळणी देखील करणं आवश्यक आहे . याशिवाय डीबीटी पर्याय सुरू असणं आवश्यक आहे .PM Kisan

Leave a comment