Pik vima watap: महाराष्ट्र राज्य शासनाने विमा कंपन्यांना शासनाचा हिस्सा रक्कम वाटप करण्याबाबत शासन निर्णय काढून देखील; शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा का वाटप केला जात नाही. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारकडून मागील सहा दिवसांपूर्वी विमा कंपन्यांना रक्कम देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. या शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना शासनाने रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
शासनाकडून पिक विमा कंपन्यांना मिळणारी रक्कम वितरित करण्यात आली आहे. पिक विमा कंपन्याला शासनाकडून मिळणारी रक्कम प्राप्त झाली असून. अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा का जमा केला नाही? असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.

रक्कम मंजुर वाटप बाकी Pik vima watap
सरकारकडून शासन निर्णय माध्यमातून रक्कम मंजूर करण्यात आली. सरकारने ही रक्कम कंपनीला वाटप करण्यास मंजूर केलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत काही कंपन्यांना ही रक्कम प्रत्यक्षपणे मिळालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये रक्कम मंजुरी मिळाल्यानंतर पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. ज्यामध्ये हिंगोली, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, वाशिम, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झाला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील येत्या दोन ते चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
सरकारकडून पिक विमा कंपनीला निधी प्राप्त होताच कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा केला. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पिक विमा मिळवण्यास जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कंपनीकडून रक्कम जमा केली जाईल.
किती रक्कम मंजुर करण्यात आली
सरकारकडून पिक विमा कंपनीला सरकारच्या हिस्सा रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्या निर्णयाच्या माध्यमातून चार ट्रिगर अंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी वाटपासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत सरकारकडून एकूण 2308 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये खरीप हंगाम 2023 मधील पिक विमा वाटपापोटी 181 कोटी तसेच रब्बी हंगाम 2023-24 मधील पिक विमा वाटपापोटी 63 कोटी आणि खरीप 2022 आणि रब्बी 2022 मधील पिक विमा वाटपापोटी 2.87 कोटी रुपयांची मंजुरी शासनाकडून देण्यात आलेली आहे. Pik vima watap
ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. यामध्ये पात्र असणारे शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली असून, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. Pik vima watap