pik vima watap update मागील बऱ्याच दिवसापासून चर्चेचा असणारा विषय आणि शेतकरी प्रतीक्षेत असलेला खरीप 2024 अंतर्गत चा पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती दिली होती. यावरच पुढील प्रक्रिया पार पाडत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दिनांक 27 मार्च 2025 पासून खरीप हंगाम 2024 चा पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे पिक विमा
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार कंपनीला सादर केली होती आणि कंपनीकडून त्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे. ज्या महसूल विभागामध्ये अग्रिम पीकविमा रक्कम मंजूर करण्यात आली होती ती रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
कृषि मंत्री यानी शब्द पाळला
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पिकविमा वाटपाबाबत बऱ्याच लोकप्रतिनिधीकडून सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी वितरित केला जाईल अशी माहिती सभागृहात दिली होती. त्यांनी दिलेलं माहितीनुसार आणि त्यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करत पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे. मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील पात्र असणारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करण्यात सुरुवात झाली आहे.
काही शेतकऱ्यांना अजूनही करावी लागणार प्रतीक्षा
पिकविमा वाटपास होण्याचे कारण कंपनीला विचारले असता कंपनीने राज्य शासनाकडून मिळणारे अनुदानित रक्कम नसल्याचे कारण दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने पिक विमा कंपनीला वितरित करण्याची रक्कम हप्ता एक या स्वरूपात वितरित केली होती. परंतु अद्याप पर्यंत काही कंपन्यांना अनुदानित मिळाली रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आलेली नाही. ज्यावेळी शासनाकडून अनुदानित मिळणारी रक्कम कंपनीला वितरित करण्यात येईल त्याचवेळी कंपनीकडून त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिकविमा जमा करण्यास सुरुवात केली जाईल.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार जळगाव धाराशिव छत्रपती संभाजी नगर जालना बुलढाणा नांदेड लातूर येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा होत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच रक्कम वितरित केली जाणार आहे. शासनाकडून मिळणारा हप्ता कंपनीला आल्यानंतर कंपनीकडून पीक विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
असे पहा अर्जाचे स्टेटस pik vima watap update
आपल्याला पिकविमा मिळणार किंवा नाही याची माहिती कशी पहायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर तयार करण्यात आला आहे. आपण या व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर वर मेसेज करून आपल्या अर्जाची आणि आपण सादर केलेल्या तक्रारीची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
मोबाईलच्या माध्यमातून आपल्या व्हाट्सअप वर आपल्या पिक विमा अर्ज स्टेटस कसं पाहायचं ? स्टेटस पाहण्यासाठी कोणत्या नंबर वर मेसेज करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. पीक विमा whatsapp नंबर