PMFBY Whatsapp Number: एक नंबर सेव करा आणि तुमच्या व्हॉट्सॲपवर पहा पिक विम्याचे स्टेटस .

PMFBY Whatsapp Number : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये महाराष्ट्र शासनाने “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2024 साठी केवळ एका रुपयात पीक विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना जलद आणि सुलभ सेवा देणे.हा आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

डिजिटल क्रांती: शेतीत नवा अध्याय

तंत्रज्ञानाचा वापर आज सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत आहे, आणि शेती त्याला अपवाद नाही. शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सुलभता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. याच अनुषंगाने “PMFBY WhatsApp चॅटबॉट” ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्यासंबंधी महत्त्वाची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहज मिळू शकते.

हे वाचा : केंद्र सरकारने पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, तर जुन्या पॅन कार्ड चे काय,पहा सविस्तर.

व्हॉट्सअॅप चॅटबॉट: माहितीचा डिजिटल प्रवेशद्वार

PMFBY व्हॉट्सअॅप चॅटबॉट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय सोपी प्रणाली आहे. याचा वापर करण्यासाठी फक्त शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असणे आवश्यक आहे. 7065514447 या क्रमांकावर संदेश पाठवून शेतकऱ्याना पीक विम्यासंबंधित सर्व माहिती मिळवता येते.
यात एक महत्त्वाची अट म्हणजे हा संदेश फक्त त्याच मोबाईल क्रमांकावरून पाठवणे गरजेचे आहे, जो शेतकऱ्यानी पीक विमा अर्ज भरताना नोंदवला गेला आहे.

PMFBY Whatsapp Number सेवांचा व्यापक पट

व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना खालील सेवा उपलब्ध होणार आहेत .

  • विमा पॉलिसीचा सद्यस्थिती अहवाल
  • पीक नुकसानीसंबंधित पूर्वसूचना
  • नोंदवलेल्या नुकसानीची माहिती
  • विमा दाव्याची स्थिती आणि
  • नुकसान पूर्वसूचना स्टेटस

हे सर्व आता शेतकऱ्याना ऑफिसला न जाता, थेट मोबाईलवर पाहता येणार आहे . ज्यामुळे शेतकऱ्याना कोठेही जाण्याची गरज पडणार नाही .

PMFBY Whatsapp Number

डिजिटल साक्षरतेकडे पुढचे पाऊल

या सुविधेमुळे शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा प्रसार होईल, असा विश्वास आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे आधीच (PMFBY Whatsapp Number) व्हॉट्सअॅप उपलब्ध असल्याने याचा वापर करणे शेतकऱ्यासाठी सोपा आहे. शिवाय, या माध्यमातून मिळणारी माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याशी संबंधित निर्णय घेणे सोपे होईल.

व्हाट्सअप वर कसे चेक करायचे ?

  • व्हाट्सअप वर चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PMFBY Whatsapp Chat boat 7065514447 हा नंबर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. (तुम्हाला सोपा होईल अशा नावाने सेव करायचा आहे.)
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप ओपन करायचे आहे (PMFBY Whatsapp Number ) व्हाट्सअप ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या नावाने नंबर सेव्ह केलेले आहे तो काढायचा आहे.
  • नंबर काढल्यानंतर तुम्हाला Hii असा मेसेज पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ताबडतोब PMFBY चा रिप्लाय येईल.
  • त्यानंतर तुम्हाला आलेल्या रिप्लाय मध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन्स असा पर्याय दिसेल.
  • सी ऑल ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इतर सर्व पर्याय दिसतील. (यामध्ये पॉलिसी टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॅस इंटीमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस इत्यादी)
  • आपण यामधील एक उदाहरण पाहूया.जसे की,पॉलिसी स्टेटस वर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिप्लाय येईल.
  • या रिप्लाय मध्ये आता तुमच्या समोर रब्बी 2024 , खरीप 2024 किंवा इतर पर्याय असे ऑप्शन दिसेल.
  • यानंतर तुम्हाला पुढील पर्याय मध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंत चे रब्बी किंवा खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहता येतील.
  • यातील कोणत्याही एकावर क्लिक केल्यास संबंधित पिक विमा अर्जाची इत्यंभूत माहिती तुमच्यासमोर उपलब्ध होईल.
  • अशा पद्धतीने तुम्हाला खरीप रब्बी- हंगामातील विविध पीक विम्याची स्थिती व्हाट्सअप वर पाहता येईल.PMFBY Whatsapp Number

1 thought on “PMFBY Whatsapp Number: एक नंबर सेव करा आणि तुमच्या व्हॉट्सॲपवर पहा पिक विम्याचे स्टेटस .”

Leave a comment