Chandrashekhar Bawankule : आता नागरिकांना घराची नोंदणी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज पडणार नाही . घर नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. यापूर्वी घराच्या नोंदणीसाठी तुम्हाला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागत . बऱ्याच वेळा अनेक जणांना कित्येक तास या कार्यालयामध्ये बसावं लागत होतं तसेच एका कामासाठी या कार्यालयामध्ये किती खीलपाटे मारावे लागतात. काही काही वेळा, काही ठिकाणी या कामासाठी एवढे पैसे त्या कामासाठी तेवढे पैसे असे करत दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण की राज्य सरकारने घराच्या नोंदणी संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

राज्यात कोठेही बसून घराची नोंदणी ऑनलाइन करता येणार
आता राज्यामध्ये कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घराची नोंदणी करता येईल. ती सर्व प्रक्रिया ऑनलाईन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 3 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमासमोर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महायुती सरकार लवकरच राज्यात एक राज्य एक नोंदणी ही योजना सुरू करणार आहे. असे चंद्रशेखर (Chandrashekhar Bawankule) बावनकुळे यांनी जाहीर केले.
हे वाचा : जिवंत सातबारा मोहीम सुरु! असा घ्या लाभ…
आता घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर (Chandrashekhar Bawankule) बावनकुळे म्हणाले घर खरेदी-विक्री करता वेळी नागरिकांना नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागत होते. तेथे घर विकणाऱ्यांना आणि घर घेणाऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच नोंदणी करत असताना मध्ये दलालाचा अडथळा असतोच. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतिमान सरकारच्या 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी आणि महानिरीक्षकांनी चांगला उपक्रम पुढे आणला आहे. राज्यात एक राज्य एक नोंदणी अशी पद्धत सरकार सुरू करत आहे. राज्यातील कुठलेही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे. Chandrashekhar Bawankule
1 मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जर तुम्ही एखादे घर खरेदी केले असेल तर तुम्हाला त्या घराची नोंदणी कुठेही बसून करता येणार आहे. पुण्यात बसून नागपुरातील घराची तर मुंबई बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. म्हणजे तुम्ही राज्यातील कुठेही राहत असो आणि कुठेही घर खरेदी करू त्या घराची नोंदणी तुम्हाला तुम्ही जिथे राहतात तिथून करता येऊ शकते. ही सगळी प्रक्रिया फेसलेस असेल.
ही नोंदणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड व दस्तऐवजांच्या मदतीने तुम्हाला फेसलेस नोंदणी करू शकतात . राज्यात ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया 1 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे . राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले सरकार लवकरच यावर काम करत आहे . आम्ही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरात अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती .आता ती राज्यभर सुरू होत आहे . Chandrashekhar Bawankule