pm kisan 20 installment : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी देशांमध्ये पीएम किसान सन्मानित योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्याचे यशस्वी त्या वितरण करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरू केली होती. यातीलच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 24 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु आता यापुढे 20 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपले शेतकरी ओळखपत्र काढणे बंधनकारक केलेले आहे.
देशातील सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान अंतर्गत मिळणाऱ्या 20 व्या (pm kisan 20 installment) हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पीएम किसान निधी योजनेतून मिळणाऱ्या प्रत्येक हप्त्यांमध्ये चार महिन्याचे अंतर असते. यातील मागील हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला आहे. पुढील हप्ता शेतकऱ्यांना जून महिन्यापर्यंत वितरित केला जाऊ शकतो. परंतु या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आपले शेतकरी ओळखपत्र काढलेले असणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांना 20 वा हप्ता वितरित करताना शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून 20 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.pm kisan 20 installment

हप्ता हवाय मग काढा शेतकरी ओळखपत्र
पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पुढील हप्त्याचा जर आपल्या लाभ हवा असेल तर आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. जर आपण 30 एप्रिल पूर्वी शेतकरी ओळखपत्र काढले नाही तर आपल्याला पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा पुढील हप्ता वितरित केला जाणार नाही. त्यामुळे अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी 30 एप्रिल पूर्वी आपल्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून फक्त पीएम किसानच नाही तर इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी देखील हे कार्ड शेतकऱ्यांना महत्त्वाचा असणार आहे. pm kisan 20 installment
हे वाचा : बांधकाम कामगारांना दिले जाणार पेन्शन; कोणत्या कामगारांना मिळणार लाभ!
कसे काढावे शेतकरी ओळखपत्र
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी स्वतः शेतकरी देखील आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकतात. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर एक पॉप बॉक्स दिसत. यामध्ये आपल्याला फार्मर यावरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आपले शेतकरी ओळखपत्र मिळवू शकता.
याशिवाय आपण आपल्या जवळील सीएससी केंद्र वर जाऊन देखील आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकता. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएसी केंद्रावर कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. ची सुविधा सरकारकडून अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी स्वतः पोर्टलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी ओळखपत्र काढावे. किंवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र सिएसी केंद्र या ठिकाणी जाऊन आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे.
शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून आपल्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवता येईल. शेतकरी ओळखपत्राचे माध्यमातून आपल्याला पिक विमा योजना असेल शेतकरी अनुदान असेल किंवा महाडीबीटी अंतर्गत मिळणारे विविध घटकाच्या अनुदान असेल. या सर्व लाभांसाठी आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच नमो शेतकरी महासंमान्य नियोजना व पी एम किसान सन्माननीती योजना या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. pm kisan 20 installment
1 thought on “pm kisan 20 installment: पीएम किसानच्या 2000 रुपयासाठी शेतकऱ्यांना काढावे लागणार शेतकरी ओळखपत्र.”