PM Kisan Land Seeding :पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना !जमिनीची नोंद नसल्यास काय होणार , पहा सविस्तर

PM Kisan Land Seeding : केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेत अनेक शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याचे कारण म्हणजे जमिनीची नोंद न होणे. त्यामुळे बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहे. पण तुम्हाला माहित आहे का ही जमीन नोंद म्हणजे काय? ती कशी केली जाते? आपण आज या लेखांमध्ये जाणून घेऊया पीएम किसान योजनेत लँड सिडिंग (जमीन नोंद) करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Kisan Land Seeding

PM Kisan Land Seeding लँड सिडींग बंधनकारक

पीएम किसान योजनेमध्ये जमिनीच्या नोंदणीचा उल्लेख आहे . शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अर्ज करताना लँड (PM Kisan Land Seeding) सिडींग बंधनकारक आहे . या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडी योग्य जमिनीची पडताळणी करून ती या योजनेशी लिंक करावी लागते . कारण की,शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकेल .

हे वाचा : पीएम किसान नवीन नाव नोंदणी नियमावली

PM Kisan Land Seeding लँड सीडींगची पद्धत

  • तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठ्याशी संपर्क करा

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तलाठी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो.

  • जमिनीची पडताळणी:

तलाठी किंवा कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करतात आणि ती पीएम किसान योजनेसाठी योग्य आहे का, याची तपासणी करतात.

  • संबंधित कागदपत्रांची माहिती मिळवा

तलाठ्याद्वारे शेतकऱ्याला कागदपत्रांची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांना ही माहिती योग्य प्रकारे मिळवून ती तपासून पाहावी लागते.

  • पडताळणी

कृषी अधिकारी कागदपत्रांची पूर्ण तपासणी करतात आणि जमिनीच्या स्थितीची सुसंगतता तपासतात.

  • लॉर्ड सीडींगचा (PM Kisan Land Seeding) स्टेटस चेक करा

शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची नोंदणी झाल्यावर स्टेटस चेक करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित पोर्टल किंवा ऑफिसमध्ये संपर्क साधून, आपली नोंदणी प्रक्रियेतून माहिती मिळवू शकता

लँड सीडींग स्टेटस कसे चेक करायचे?

  • लँड सीडींग स्टेटस (PM Kisan Land Seeding) चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
  • पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधार नंबर द्वारे गेट डाटा या बटणावर क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण माहिती उपलब्ध होईल .
  • यामध्ये तुम्हाला लँड सीडींग या पर्यायासमोर No असे दाखवत असल्यास तुम्हाला लँड सीडींग करणे बंधनकारक राहील.
  • यानंतर तुम्हाला संबंधित विंडोजची झेरॉक्स काढायचे आहे. यासोबत तुम्हाला आधार कार्ड, जमिनीचा सातबारा जोडावयाचा आहे
  • त्या नंतर ही सगळी कागदपत्रे तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी कार्यालयात जमा करावी लागतील .याच ठिकाणी तुमची लँड सीडींगची समस्या सोडवली जाईल.

बऱ्याच जणांना ऑनलाइन Land Seeding करता येते अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु ऑनलाइन पद्धतीने किंवा स्वतः अर्ज करून Land Seeding करता येत नाही. Land Seeding करण्यासाठी आपणास वर दिलेल्या प्रक्रिया राबवावी लगेल. लवकरच प्रत्येक तालुका कृषि कार्यालय मध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे कामकाज पाहण्यासाठी एक व्यक्ति नेमवण्यात येत आहे. तेथून आपली या योजना संबंधी असणारी सर्व अडचण दूर केली जाईल.

निष्कर्ष

पीएम किसान योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची योग्य नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तलाठी, कृषी अधिकारी, आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी महत्त्वाची आहे. योग्य नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळते आणि योजनांचा लाभ मिळवता येतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी या प्रक्रियेचे पालन करून पीएम किसान योजनेचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे.PM Kisan Land Seeding .

Leave a comment