PM Kisan Mandhan Yojana :या योजने मधून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3000 रुपये ,असा घ्या लाभ..!

PM Kisan Mandhan Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक कर्जा लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. ते योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची पेन्शन योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे वृद्धपकाळातील आर्थिक भविष्य सुरक्षित होणार आहे

केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 12 सप्टेंबर 2019 रोजी केली आहे .या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे .जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता .चला तर आज आपण या लेखामध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती .PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण आहे पात्र?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती करावे लागतील .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
  • या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असले पाहिजे .
  • या योजनेच्या लाभासाठी दरमहा उत्पन्न 15000 रुपया पेक्षा कमी असले पाहिजे तरच या योजनेचा लाभ घेता येईल .
  • शेतकऱ्यांच्या नावावर 2 हेक्टर पर्यंत शेती योग्य जमीन असावी .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बचत बँक खाते असणे बंधनकारक आहे .

60 वर्षानंतर मिळणार दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन

या योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजेच शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3000 हजार रुपये पेन्शन मिळते. ही पेन्शन जीवनभर देण्यात येते. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असून ती अंशदानावर आधारित आहे .म्हणजेच, या योजने सहभागी होणारा शेतकरी हा त्यांच्या वयानुसार दरमहा ठराविक रक्कम अंशदान म्हणून जमा करतो आणि केंद्र सरकारची तेवढीच रक्कम त्याच्या खात्यात जमा करते .उदाहरणार्थ, जर एकदा तरुण शेतकरी या योजनेत सहभागी झाला तर त्याला कमी रक्कम भरावी लागते,आणि जास्त वयाच्या शेतकऱ्याला थोडे जास्त रक्कम भरावी लागते.PM Kisan Mandhan Yojana

पती-पत्नी दोघांनाही या योजनेत लाभ मिळू शकतो का?

शेतकरी पती किंवा पत्नी दोन्ही जोडीदारांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजेच, पती आणि पत्नी दोघेही योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत असतील तर दोघीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात .त्या व्यतिरिक्त जर योजनेत योगदान करणाऱ्या चा मृत्यू झाला ,तर त्याच्या पत्नीला (किंवा पतीला) दर महिन्याला 1500 रुपये म्हणजेच पेन्शनच्या 50% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाते .तसेच, जोडीदार योजनेचा पुढील लाभ घेऊ शकतो किंवा संपूर्ण रक्कम व्याजासह काढू शकतो .जर एखाद्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर ,त्या शेतकऱ्याला जमा केलेली रक्कम व्याजासह परत दिली जाते .जर दोघांचाही मृत्यू झाला तर मृत्यूनंतर योजनेत जमा झालेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस दिली जाते .

सहज नोंदणी व पोर्टेबिलिटीची सुविधा

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक पूर्णपणे पोर्टेबल आणि केंद्रीय कृत आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही राज्यातून या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो .पेन्शन फंडाची जबाबदारी ही भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC) यांच्याकडे आहे .तसेच शेतकरी अंशदान रक्कम ऑटो-डेबिट पद्धतीने भरता येते .PM Kisan Mandhan Yojana

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

या योजनेत आतापर्यंत 23.38 लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन (PM Kisan Mandhan Yojana) योजनेत सरकारी आकडेवारीनुसार, 6 ऑगस्ट 2024 पर्यंत देशभरातील 23.38 लाखाहून जास्त नोंदवला आहे .या आकडेवारीवरून ही योजना लोकप्रियता आणि शेतकऱ्यांमध्ये बसलेला विश्वास दिसून येत आहे .ग्रामीण भागातील गरिबांनी वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठा आधार ठरली आहे

या योजनेचा अर्ज कोठे करावा लागेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर ( CSC) येथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करून घेऊ शकतात . या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत,जसे की,आधार कार्ड , बँक खाते तपशील, जमिनीची नोंदणी .

यानंतर तुमच्या वयानुसार मासिक अंशदान निश्चित केले जाईल आणि बायोमेट्रिक प्रमाणिकरणाद्वारे नोंदणी पूर्ण करण्यात येते .या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या राज्यातील पीएम -किसान नोडल ऑफिसरशीही संपर्क साधू शकतात .PM Kisan Mandhan Yojana

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज


Leave a comment