PM Kisan Sanman Nidhi Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधी चा 19 वा हप्ता देशातील अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या यासंबंधीची एक मोठी अपडेट समोर आली आहे . केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान समान निधीचा 19 वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे .

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत .त्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करतील . तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतीशी संबंधित इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक योजना चा शुभारंभ करतील,अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली .
हे वाचा : सोलर पंपाचे पैसे भरले परंतु अजून पंप वाटपाचा पत्ताच नाही…!
पीएम किसान योजनेत दरवर्षी 6000 रुपये मानधन
प्रधानमंत्री किसान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) सन्मान निधी ही योजना केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी योजना आहे .या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मानधन दिले जातात .ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये आधार सलंग्न बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते . पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी 15 ऑक्टोंबर 2024 रोजी जारी केला होता .
ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे
सरकारने PM Kisan Sanman Nidhi Yojana योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा आणि फसवणूक होऊ नये, यासाठी ई- केवायसी बंधनकारक केली आहे .
ई-केवायसी करण्याच्या तीन पद्धती
सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी तीन पद्धती दिल्या आहेत .
- ओटीपी आधारित ई-केवायसी : ही पद्धत पीएम किसान पोर्टलवर आणि मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे .
- बायोमेट्रिक ई-केवायसी : बायोमेट्रिक ई-केवायसी ही सेवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि राज्यसेवा केंद्र (SSK) येथे उपलब्ध आहे.
- फेस ऑथोंटिकेशन ई-केवायसी : ही सुविधा पीएम किसान मोबाईल ॲप द्वारे केली जाऊ शकते .
ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्त्या अडकू शकतो .ई-केवायसी केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही,असे सरकारनं स्पष्ट केले आहे .
निष्कर्ष
शेतकऱ्यांसाठी पीएम (PM Kisan Sanman Nidhi Yojana) किसान सन्मान निधी मोठी आर्थिक मदत ठरत आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा हप्ता जारी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा निश्चित लाभ मिळू शकेल. PM Kisan Sanman Nidhi Yojana