Solar Pump सोलर पंपाचे पैसे भरले परंतु अजून पंप वाटपाचा पत्ताच नाही…!

Solar Pump : राज्य शासनाच्या सौर ऊर्जा पंप योजनेअंतर्गत अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरून दोन महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांना सोलार पंप वाटपाची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनी निवडण्यासाठी ‘चॉइस’ मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Solar Pump

सोलार पंपांसाठी शासनाचे प्रोत्साहन

राज्य शासनाने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री होणाऱ्या वीजटंचाईतून मुक्त करण्यासाठी आणि शेतीला सातत्याने पाणीपुरवठा होण्यासाठी सोलार पंप योजनेला चालना दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सोलार पंप उपलब्ध करून दिले जातात. मात्र, पैसे भरूनही पंप मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळत चालल्या आहेत. यामुळे शासनाने यासंदर्भात त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : रेकॉर्ड वरील रस्ता अडविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

Solar Pump शेतकऱ्यांची नाराजी

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोलार पंपासाठी अर्ज केला होता . अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पेमेंट करा असे ऑप्शन आले होते. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सोलर पंप (Solar Pump) साठी रक्कम देखील भरली. परंतु, इतका कालावधी उलटूनही त्यांना पंप मिळण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली आहे.

विजेच्या अनियमिततेमुळे अडचणी

सध्या शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री आणि आठ दिवस दिवसा अशा स्वरूपात वीज पुरवठा केला जातो. मात्र, हा पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. वारंवार रोहित्रातील बिघाड, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाला पिके जगविणे कठीण झाले आहे.

सोलार पंप – शेतकऱ्यांसाठी वरदान

रात्रीच्या वेळी शेतात पाणी देताना साप, विंचू यांसारख्या संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच वीज कमी दाबाने मिळाल्यास मोटारी चालवणे कठीण होते. अशा परिस्थितीत सोलार पंप (Solar Pump) हे शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरू शकतात. मात्र, प्रत्यक्ष सोलार पंप (Solar Pump) मिळाल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही.

निष्कर्ष

सोलार पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता शासन आणि संबंधित विभागानेही तत्परता दाखवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलार पंप देण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा धुळीस मिळतील आणि शासनाच्या योजनांवरचा विश्वास उडण्याची शक्यता निर्माण होईल. Solar Pump

Leave a comment