PM Kisan Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत प्रत्येकी हप्त्यात शेतकऱ्यांना 2 हजार रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले असून पुढच्या महिन्यात या योजनेचा 19 वा हप्ता देण्यात येऊ शकतो.
पीएम किसान योजने पती आणि पत्नी दोघांनाही लाभ घेता येऊ शकतो का?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे. आणि ती जमीन शेतीयोग्य जमीन असली पाहिजे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमिनीची नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांनाच PM Kisan Yojana योजनेअंतर्गत मानधन दिले जाऊ शकते. या योजनेच्या नियमानुसार, पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही . फक्त ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे वाचा : Birsa Munda Krushi Kranti Yojana: शेतकऱ्यांसाठी ठरते फायदेशीर ! तर पहा किती आणि कसे मिळते अनुदान?
PM Kisan Yojana योजनेचा पुढील हप्ता कधी येणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो . या (PM Kisan Yojana ) योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. या अगोदरचा हप्ता 18 वा ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेला होता. त्यानंतर आता पुन्हा या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार आहे.
PM Kisan Yojana हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाच्या अटी
- डीबीटी (Direct Benefit Transfer): पीएम किसान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी खात्याचे डीबीटी प्रमाणीकृत असणे अनिवार्य आहे.
- केवायसी (KYC): योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे अत्यावश्यक आहे. जर केवायसी पूर्ण केले नसेल, तर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.
PM Kisan Yojana शेतकऱ्यांसाठी सूचना
- आपल्या नावावर जमीन नोंदणी असल्याची खात्री करा.
- बँक खाते डीबीटीसाठी अद्ययावत ठेवा.
- केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नियम समजून घेऊन आणि आवश्यक अटी पूर्ण करून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे निश्चित करावे.PM Kisan Yojana