bambu utpadak : सोलापूर जिल्ह्यातील एमपीसी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन, त्याचे कोळशाबरोबर मिश्रण करून जाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत बांबू बायोमासच्या शाश्वत पुरवठ्यासाठी पन्नास वर्षाच्या खरेदीसाठी करार करण्यात येणार आहे.
bambu utpadak राज्य सरकारची भूमिका
bambu utpadak मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनटीपीसीला पत्र लिहून पाठवले होते या पत्रामध्ये सोलापूर येथील एनटीपीसीच्या प्रकल्पासाठी कोळशा एवजी 100% बांबू आधारित बायोमासचा वापर करावा अशी मागणी केली होती. यानंतर एनटीपीसीचे अधिकारी, मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्कफोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, आणि प्रकल्प प्रमुख तपन कुमार बंडोपाध्याय यांची बैठक झाली. या बैठक मध्ये कोळशाबरोबर बांबू बायोमासचा वापर करण्यावर सहमती झाली.
बांबू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ
ऊर्जा निर्मितीसाठी बांबू बायोमास विकत घेऊन कोळशाबरोबर मिश्रण करून ते जाळण्याचा निर्णय सोलापूर एनटीपीसीने घेतला आहे असे, गुरुदीप सिंग म्हणाले. वार्षिक 40 लाख टन कोळसा एनटीपीसीला सोलापूरला लागतो. यामध्ये सुरुवातीला दहा टन बांबू बायोमासचे केली जाईल. यासाठी आम्हाला सुरुवातीला जवळपास चार लाख टन बायोमासची गरज लागणार आहे. या निर्णयाचा थेट लाभ बांबू उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकेल.
शेतकरी उत्पादक कंपन्यांशी दीर्घकालीन करार
bambu utpadak बांबू बायोमासचा शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, एनटीपीसीने शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत ५० वर्षांच्या खरेदीकराराचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन बाजारपेठ मिळणार आहे. विशेषतः सोलापूर, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीवर भर दिल्यास, या प्रकल्पासाठी आवश्यक बायोमास पुरवठा सुलभ होईल.
हे वाचा: बांबू लागवड अनुदान योजना
शेतकऱ्यांसाठी नवीन संधी
गुरुदीप सिंह यांनी नमूद केले की, “बांबू बायोमासच्या खरेदीसाठी आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांशी दीर्घकालीन करार करण्यास तयार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होईल.”
बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन
पाशा पटेल यांनी नमूद केले की, सोलापूर, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांमध्ये बांबू लागवड वाढल्यास सोलापूर एनटीपीसी प्रकल्प पूर्णतः बांबू बायोमासवर चालवता येईल. यासाठी ‘मित्रा’ संस्थेमार्फत शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य पुरवले जाईल, असे प्रवीणसिंह परदेशी यांनी जाहीर केले.
पर्यावरण पूरक उपाय
बांबू बायोमासचा वापर केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईलच, पण पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळेल. कोळशाच्या जळणामुळे होणारे प्रदूषण कमी होईल, तसेच ऊर्जानिर्मितीसाठी एक पर्यावरणस्नेही पर्याय मिळेल.
शेवटची नोंद
एनटीपीसीच्या (National Thermal Power Corporation) या निर्णयामुळे बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीत गुंतवणूक करून आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला सरकारी व खाजगी संस्थांचे सहकार्य मिळाल्यास हा प्रकल्प यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.