Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maharashtra HMPV Virus महाराष्ट्रातील नागपूर जिल्हया मध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू विशेष लहान मुलांमध्ये श्वसनाच्या त्रासाला कारणीभूत ठरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर अशी नवीन साथ समोर आल्याने लोकांना पुन्हा लॉकडाऊनच्या आठवणी सतावत आहेत, मात्र यावरून भिती बाळगण्याची गरज नाही. अशी माहिती देखील तज्ञानी व आरोग्य विभागाने दिली आहे.

Maharashtra HMPV Virus

Maharashtra HMPV Virus जगभरात कोरोंना महामारी पाहिलेल्या नागरिकांना नवीन विषाणू बद्दल माहिती कळताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोंना महामारितून कसे बसे सावरलेल्या नागरिकांना परत एकदा त्याच परिस्थिति ला सामोरे जावे लागेल का अशी भीती मनात निर्माण झाली आहे. या नागरिकांच्या भीती ला केंद्रीय आरोग्य विभाग व महाराष्ट्र आरोग्य विभागाने सूचना जारी केल्या आहेत त्यांनी दिलेल्या सुचनेमद्धे नगरीकणी काळजी घ्यावी पण घाबरून जाण्याची गरज नाही. अशी माहिती दिली आहे.

Maharashtra HMPV Virus आरोग्य विभागाने जाहीर सूचना मध्ये काय सांगितले

  • HMPV विषाणू गंभीर नाही, तरी सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
  • HMPV व्हायरसवर अद्याप लस नाही.
  • HMPV विषाणूचा धोका कमी, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये.
  • केंद्राच्या निर्देशांनुसार आवश्यक उपाययोजना.
  • सर्दी, खोकला, सौम्य ताप ही या व्हायरसची लक्षणं.
  • पाच वर्षांखालील सर्वच लहान मुलांना HMPVचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.
  • ९ महिन्यांच्या आत जन्मलेली बाळं किंवा दमा असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक.
  • HMPVमुळे जीवाला धोका निर्माण होण्याचं प्रमाण अतिशय कमी; त्यामुळे कोव्हिड-१९ विषाणूशी तुलना नको.
  • या व्हायरसचं अस्तित्व पहिल्यांदा २००१ साली सिद्ध झाले; मात्र HMPV व्हायरस किमान ५०-७० वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे तज्ञांचे मत.

जगात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दुसऱ्या उत्तरार्धात HMPVचा प्रादुर्भाव वाढतो

एचएमपीव्ही विषाणू म्हणजे काय?

एचएमपीव्ही (Human Metapneumovirus) हा एक श्वसनविकारजन्य विषाणू असून, त्याचा प्रभाव प्रामुख्याने लहान मुलांवर होतो. हा विषाणू मुख्यतः खोकला, श्वसनाचा त्रास, ताप, नाक वाहणे आणि थकवा यांसारख्या लक्षणांना कारणीभूत ठरतो. हा विषाणू भारतात नवीन नसून तो पूर्वीपासून अस्तित्वात आहे.

हे वाचा: आरोग्य विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’

Maharashtra HMPV Virus राज्यातील स्थिती

  • नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळले असून कर्नाटकातही या विषाणूच्या काही घटना समोर आल्या आहेत.
  • भारतातील ICMR आणि इंटीग्रेटेड डिसीज सर्विलेन्स प्रोग्रामने दिलेल्या माहितीनुसार, इन्फ्लूएंझासारख्या या विषाणूमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढलेली नाही.
  • लहान मुलांना या विषाणूचा धोका तुलनेने जास्त असतो, मात्र तो गंभीर स्वरूपाचा नाही.

चीनमधील परिस्थिती आणि भारताची तयारी

चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूच्या घटना वाढल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांमध्ये सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. मात्र, भारतात या विषाणूविरोधात आधीपासूनच प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) तयार झाल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पसराचा धोका भारतात नाही.

लक्षणे आणि उपचार

एचएमपीव्हीची लक्षणे साध्या सर्दी आणि फ्लूसारखी असतात.

सामान्य लक्षणे:

  • ताप
  • खोकला
  • सर्दी
  • श्वसनाचा त्रास
  • थकवा

काळजी घेण्याचे उपाय:

  1. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  2. वारंवार हात धुणे.
  3. लहान मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क रहा.
  4. लक्षणे गंभीर वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लॉकडाऊनची शक्यता नाही

CSIR चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की:

  • एचएमपीव्ही विषाणूमुळे मृत्यूचा धोका नाही.
  • भारतात लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही.
  • मास्क वापरण्याची सक्ती नाही, मात्र खबरदारी म्हणून वापर करू शकता.

Maharashtra HMPV Virus नागरिकांसाठी संदेश

एचएमपीव्ही विषाणू कोरोंनाच्या तुलनेत एवढा घातक नाहीच, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची कसलीही गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास या विषाणूपासून सहज बचाव करता येतो. सरकार आणि आरोग्य यंत्रणा अत्यंत सतर्क असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. यावर अद्याप लस जरी उपलब्ध नसली तरी हा विषाणू (Maharashtra HMPV Virus) कोरोंना एवढा घातक नाही. त्या मुळे देशात किंवा राज्यात लॉकडाउन लावण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही फक्त काळजी घेणे अवश्यक आहे. अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने नागरिकांना दिली आहे.

1 thought on “Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.”

Leave a comment

Close Visit Batmya360