राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
मागील काही वर्षापासून बाल मृत्यू दर कमी करण्यास शासनाला यश मिळत आहे. या साठी सरकार कडून विविध उपक्रम राबवले जातात. ज्या उपक्रमाच्या मदतीने देशातील बाल मृत्यू तसेच बालकांचे आरोग्य या विषयी सर्व खबरदारी घेऊन बालकांना योग्य वेळी उपचार करणे. आजच्या या लेखात आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या विषयी सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 1 एप्रिल 2013 पासून राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून जर त्यांच्यात काही लक्षणे आठल्यास तात्काळ त्या आजारावर शासनाकडून मोफत उपचार करण्यात येतो.
योजनेचे नाव | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम |
योजना कोणामार्फत राबवली जाते. | आरोग्य विभाग भारत सरकार |
लाभ | लहान मुलांमध्ये आढळणारे आजार व मोफत उपचार देणे. |
अधिकृत संकेतस्थळ | |
लाभार्थी | राज्यातील सर्व 0 ते 18 वयोगटातील मूल मुली. |
योजनेचा उद्देश | लहान मुलांमधील जन्मानंतर विकृती, घटक कमतरतेमुळे होणारे आजार, मूल वाढीच्या वेळी होणारे आजार याची वेळेत तपासणी करून उपचार करणे. |
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा महिला व बालविकास तसेच शिक्षण विभाग यांच्या मदतीने राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आढळणाऱ्य आजारावर वेळीच मोफत उपचार देण्यात येतो. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेची अमलबजावणी
दिनांक ०१ एप्रिल २०१३ पासून सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरू झालेला आहे . या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पथके कार्यरत करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात २ वैदयकीय अधिकारी (१ पुरुष आणि १ स्त्री ), १ आरोग्य सेविका व १ औषध निर्माता यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालया मध्ये या पथकांचे मुख्यालय ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापुर्वी पथकातील व्यक्ति यांना प्रशिक्षण देण्यात येते.
सध्या या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विदयार्थ्याची आरोग्य तपासणी केली जात आहे. सदर पथकांना तपासणी करण्यासाठी आवश्यक ती वैदयकीय उपकरणे व औषधे याचे किट प्रदान करण्यात येते. पथकामार्फत तपासणी केल्यानंतर विदयार्थ्यांना पुढील उपचार व तपासण्या ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे दिल्या जातात.
राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान निष्कर्ष
या योजनेच्या माध्यमातून देशातील करोडो बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. ज्या तपासणीतून लाखों बालकांना आजार झालेले असतात. त्या आजार सापडलेल्या बालकांना त्या आजारावर लवकरात लवकर उपचार करून पुढील निर्माण होणाऱ्या धोक्या पासून सुटका करण्यात येते. हे अभियान महिला व बालविकास तसेच शिक्षण विभागाच्या मदतीने राबवण्यात येत असून त्यांच्या मदतीने हे अभियान देशातील प्रत्येक बालक व विद्यार्थी या अभियाना अंतर्गत आपले आरोग्य तपासणी पूर्ण करतो व मोफत उपचार मिळवतो.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “0 ते 18 वयोगटातील मुलं मुली यांच्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम”