HMPV virous : नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय.

HMPV virous : कोविड-19 महामारीनंतर आता आणखी एका virous ने लोकांच्या चिंतेत भर घातली आहे. या virous चे नाव आहे ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV). याचा उगम चीनमध्ये झाला असून भारतातही काही प्रकरणे समोर आली आहेत. या virous मुळे सर्दी, खोकला, आणि श्वसनाचे त्रास होतात. पण याचा सामना कसा करायचा आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे, याबद्दल सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊया

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
HMPV virous

HMPV virous म्हणजे काय?


HMPV हा एक virous  आहे जो Paramyxoviridae कुटुंबातील आहे. 2001 साली तो प्रथम ओळखला गेला. हा virous  मुख्यतः श्वसन संस्थेवर परिणाम करतो. लहान मुले, वृद्ध लोक आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो.

हे वाचा: काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही

लक्षणे कोणती आहेत?


HMPV virous ची लक्षणे कोविड-19सारखीच दिसतात.

  • ताप
  • सर्दी आणि खोकला
  • नाक बंद होणे किंवा वाहणे
  • घसा खवखवणे
  • थकवा आणि अशक्तपणा
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत दुखणे, न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिस
    लहान मुलांमध्ये:
  • अन्न गिळण्यात त्रास
  • चिडचिडेपणा
  • झोपेत अडथळा

कोणाला जास्त धोका आहे?


HMPV मुख्यतः अशा लोकांना जास्त धोका पोहोचवतो:

  • ज्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत आहे.
  • लहान बालके आणि वयोवृद्ध व्यक्ती.
  • इतर गंभीर आजार असलेले रुग्ण.

संशय झाल्यास चाचणी कशी केली जाते?

  • सामान्य व्यक्तींना नाक किंवा घशातील स्वॅबद्वारे चाचणी केली जाते.
  • गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी विशेष नमुने (ब्रॉन्कोआल्व्होलर लॅव्हेज, प्रेरित थुंकी) घेतले जातात.

HMPVपासून बचावाचे उपाय:


HMPVचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारा:

  1. हातांची स्वच्छता: वेळोवेळी साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा.
  2. मास्क वापरा: गर्दीच्या ठिकाणी जाण्याची वेळ आलीच, तर मास्क वापरा.
  3. हायड्रेट राहा: पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
  4. प्रोटीनयुक्त आहार: अंडी, कडधान्ये, दही यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
  5. गरम पाणी व ग्रीन टी: हिवाळ्यात गरम पाणी पिणे आणि ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरते.

निष्कर्ष:


HMPV virous बद्दल घाबरण्याचे कारण नाही. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास आपण या virous पासून स्वतःचा बचाव करू शकतो. जर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले ठेवूया आणि सुरक्षित राहूया!

Close Visit Batmya360