Health Insurance : कोरोना संसर्गानंतर आणेक लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व लक्षात आले आणि आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. हॉस्पिटल आणि उपचाराचा महागडा खर्च खिशातून भरावा लागू नये यासाठी लोक आरोग्य विमा घेतात. मात्र, नुकत्याच आलेल्या एका अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विमा नूतनीकरण करण्याचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विमाधारक संपूर्ण प्रीमियम भरत नाहीत किंवा कमी कव्हर असलेल्या योजनांमध्ये स्थलांतर करत आहेत. यामागील नेमके कारण काय आहे?

आरोग्य पॉलिसीधारक चिंतेत?
आरोग्य विम्याच्या वाढत्या प्रीमियममुळे (Health Insurance) विमाधारक चिंतेत आहेत. यावर्षी 10 पैकी 1 ग्राहकाने त्याचा आरोग्य विमा नूतनीकरण केला नाही, तर काही लोकांनी पूर्ण प्रीमियम भरणे टाळले. अहवालानुसार, एकूण विमाधारकांपैकी सुमारे 10% लोकांच्या प्रीमियममध्ये 30% किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांनी पूर्ण प्रीमियम भरणे शक्य केले नाही.
विमाधारक का होतात कमी ?
विमा कंपन्यांच्या म्हणण्यानुसार क्लेम रेशो वाढल्यामुळे प्रीमियममध्ये वाढ करावी लागली आहे. क्लेम रेशो म्हणजे गोळा करण्यात आलेल्या प्रीमियमपैकी किती दावे मंजूर झाले. जर जास्त दावे येऊ लागले तर कंपन्या प्रीमियम वाढवतात. साधारणतः विमा कंपन्या (Health Insurance) सरासरी महागाई लक्षात घेऊन दर तीन वर्षांनी प्रीमियम वाढवतात. वैद्यकीय महागाई म्हणजे उपचारांचा वाढता खर्च, तसेच विमाधारकांचे वाढते वय यामुळेही प्रीमियम वाढतो.
विमा कंपन्यांचे म्हणणे आहे की, आरोग्य पॉलिसीचा प्रीमियम दरवर्षी सारखा राहत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीमुळे पण देखील प्रेमियम वाढवला जातो. पॉलिसीबझारच्या अहवालानुसार,वाढत्या प्रीमियम,लोकांचे खर्च कमी करणे आणि वैद्यकीय मागायला तोंड देण्यासाठी विमा कंपन्या आणि आरोग्य विमा क्षेत्राच्या योजनांमध्ये बदल दिसून येत आहे
आरोग्य विमा किती महाग झाला?
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मगील 10 वर्षांचा विचार केला तर , 52% पॉलिसीधारकांच्या प्रीमियममध्ये वर्षाची 5-10% वाढ झाली आहे. 38% पॉलिसीधारकांसाठी वार्षिक वाढ 10-15% आहे, तर 3% लोकांचा प्रीमियम 15-30% दराने वाढला आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे काही लोकांनी आरोग्य (Health Insurance) विम्याकडे पाठ फिरवली आहे.
विमा कंपन्यांच्या मते, वैद्यकीय महागाई हा कळीचा मुद्दा आहे. सध्या वैद्यकीय महागाई दरवर्षी 145 दराने वाढत आहे, आणि त्या तुलनेत प्रीमियम वाढ मर्यादित ठेवली जात आहे. त्यामुळे विमाधारकांसाठी हा अतिरिक्त आर्थिक भार बनत चालला आहे.
निष्कर्ष
आरोग्य विमा गरजेचा असला तरी वाढत्या प्रीमियममुळे अनेक ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विमा कंपन्यांनी तसेच सरकारनेही यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या आरोग्य विमा योजना आणि सरकारी पातळीवर अधिक सहकार्य मिळाल्यास हे संकट काही प्रमाणात टाळता येऊ शकते. Health Insurance