PM Vidyalaxmi Yojana : केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी सरकारकडून पीएम विद्या लक्ष्मी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून 2024-25 ते 2030-31 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे . शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे . पीएम विद्या लक्ष्मी योजनेचा उद्देश देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्ब असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडावे लागू नये,हा आहे.

काय आहे पीएम विद्या लक्ष्मी योजना?
बँक ऑफ बडोदाने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री विद्या मलक्ष्मी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे .पीएम विद्या (PM Vidyalaxmi Yojana) लक्ष्मी योजना ही केंद्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी राबवला जाणारा महत्त्वाचा उपक्रम आहे .पैशाच्या कमतरतेमुळे देशातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश आहे . सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एका निवेदनात सांगितले आहे की, या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर बँक ऑफ बडोदा मधून डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात.
हे वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2024 चा पिक विमा जमा होण्यास सुरवात.
पीएम विद्या लक्ष्मी योजना विशेष का आहे?
पीएम विद्या लक्ष्मी (PM Vidyalaxmi Yojana) योजनाही एक विशेष कर्ज सेवा देणारी योजना आहे .या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतेही कारण न ठेवता आणि कोणत्याही हमीदराशिवाय दिले जातील,जे हे कर्ज डिजिटल आणि प्रक्रिया द्वारे दिले जाते .
कर्जाची रक्कम कालावधी आणि परतफेड रक्कम कालावधी किती आहे
- जर तुम्हाला हे कर्ज घ्यायचे असेल तर कर्जाची रक्कम कोर्स आणि बँकेनुसार बदलू शकतो
- पीएम विद्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत परत फेरीचा कालावधी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर .1वर्षाच्या किंवा वाढून कालावधी सह दिले जातो PM Vidyalaxmi Yojana
पीएम विद्या लक्ष्मी योजनांचे फायदे
- पीएम विद्या लक्ष्मी (PM Vidyalaxmi Yojana) योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे .
- ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.5 लाखापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना व्यास सवलत दिली जाईल .आठ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना 3% दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल .
- संबंधित योजनेअंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध आहे,त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवता येणार आहे.
या योजनेचा अर्ज कसा करायचा?
- विद्यार्थ्यांना कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विद्यालक्ष्मी योजनेच्या https://www.vidyalakshmi.co.in/Students/# अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
- त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनाप्रोफाइल तयार करा व नोंदणी करून घ्यावी लागेल .
- त्यानंतर तुम्हाला अर्ज भरून आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरून आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करून घ्यावे लागेल .
- उपलब्ध कर्ज योजनेमधून तुमच्या गरजेनुसार योग्य तो कर्ज पर्याय निवडून घ्या आणि अर्ज सबमिट करा .
- अशा पद्धतीने तुम्ही पीएम विद्या लक्ष्मी योजनेचा अर्ज करू शकतात .
या योजनेचा उद्देश
या बाबतीत बँक बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले की, पीएम विद्या (PM Vidyalaxmi Yojana) लक्ष्मी योजना ही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम आहे . या योजनेचा उद्देश पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे . PM Vidyalaxmi Yojana