Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र संख्या दुप्पट होणार: दर देखिल वाढले

Aple sarkar seva kendra: महाराष्ट्र राज्यात वेगाने डिजिटायलेशन करता यावे आणि ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राचे जाळे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्या बाबतची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.

Aple sarkar seva kendra

किती सेवा केंद्र होणार वाढ Aple sarkar seva kendra

महाराष्ट्र राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार राज्यातील लोकसंख्या आणि प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार आपले सरकार सेवा केंद्र ची संख्या वाढवण्यात येणार आहे. घोषणा माननीय मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. या नवीन नियमानुसार ग्रामपंचायत स्तरावर 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना एक ऐवजी आता नव्याने दोन आपले सरकार सेवा केंद्र तर 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन ऐवजी आता चार आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यात येणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महानगरपालिका क्षेत्रात 25000 लोकसंख्येसाठी एक ऐवजी आता दोन आपले सरकार सेवा केंद्र वितरित केले जातील. नगरपरिषद क्षेत्रामध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

पीक विमा योजनेत होणार मोठे बदल

नविन आपले सरकार सेवा केंद्र नियम Aple sarkar seva kendra

  • ज्या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 5000 पेक्षा कमी आहे अशा ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकार सेवा केंद्र दिले जातील.
  • ज्या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे अशा ग्रामपंचायत क्षेत्रात चार आपले सरकार सेवा केंद्र दिले जातील.
  • मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 12500 लोकसंख्येसाठी दोन या प्रमाणात आपले सरकार सेवा केंद्र वितरित केली जाते.
  • इतर महानगरपालिका व नगरपरिषद अंतर्गत दहा हजार लोकसंख्येसाठी दोन या प्रमाणात आपले सरकार सेवा केंद्र वितरित केली जाते.
  • पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत एकूण चार आपले सरकार सेवा केंद्र नव्याने वितरित केले जाते.

सेतू सुविधा केंद्र दरात देखिल सुधारणा

जुन्या नियमावलीनुसार आपले सरकार सेवा केंद्र मधून मिळणाऱ्या प्रत्येक दाखल्यासाठी 20 रुपये एवढा शुल्क आकारला जात होता. दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा विचार करत राज्य शासनाने हा शुल्क देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमानुसार आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणाऱ्या दाखल्यासाठी प्रति दाखला 50 रुपये या प्रमाणात शुल्क आकारला जाणार आहे. यामध्ये 32 रुपये आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे, 5 रुपये जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा असेल, 10 रुपये महाआयटी विभागाचा वाटा असेल आणि 5 रुपये राज्यसेतू केंद्राचा वाटा असेल. या प्रमाणात या पन्नास रुपयाची विभागणी केली जाईल.Aple sarkar seva kendra

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

घरपोहोच सुविधां उपलब्ध होणार

राज्यातील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळावे याकरिता राज्य शासन मिळणारे दाखले घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करत आहे. यानुसार प्रत्येक भेटीसाठी 100 रुपये एवढा शुल्क आकारला जाणार आहेत. ज्यामध्ये महा आयटी सेवा दर 20 रुपये आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना 80 रुपये या प्रमाणात रक्कम विभागणी केली जाईल.

याव्यतिरिक्त कागदपत्राचा मूळ शुल्क पन्नास रुपये हा देखील अतिरिक्त द्यावा लागेल. म्हणजे घरपोच सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना एक भेट आणि दाखला याचे एकूण 150 रुपये एवढा शुल्क भरावा लागेल.

नागरिकांना करूनच अर्ज करण्याची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच ही सुविधा लागू करून नागरिकांना घरी बसून आपले कागदपत्रे मागवण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. Aple sarkar seva kendra

Leave a comment