असे घ्या व्यवसाय सूरु करण्यासाठी PMEGP कर्ज ; या लिंक द्वारे करा अर्ज : PMEGP Loan Yojana 2024

PMEGP Loan Yojana 2024 केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना राबवली जाते ग्रामीण भागामध्ये खाद्य ग्रामोद्योग आयोग आणि खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे सर्व जिल्ह्यांमधील बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्याचा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMEGP Loan Yojana 2024

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये वैविध्यपूर्ण उद्योगांची स्थापना करून ग्रामीण कारागीर आणि तरुण व्यक्तींना व्यवसायाच्या संधी निर्माण करून कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून ग्रामीण भागामध्ये शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर थांबवण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे प्रत्येक प्रकल्पातून अंदाजे तीन ते पाच लोकांना रोजगार देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

PMEGP Loan Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • PMEGP Loan Yojana 2024 बचत गट PMEGP द्वारे कर्ज घेण्यास पात्र असणार आहेत
  • सरकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था देखील PMEGP कर्जासाठी पात्र असणार आहेत
  • या योजनेसाठी कोणतेही उत्पन्न निर्बंध नाही कारण सर्व उत्पन्न गटातील उमेदवार पात्र असतील
  • इच्छित प्रकल्पामध्ये 10 लाखांपेक्षा कमी उत्पादन रक्कम किंवा पाच लाखांपेक्षा कमी सेवा रक्कम समाविष्ट असल्यास कोणतीही शैक्षणिक आवश्यकता नाही
  • ही योजना प्रामुख्याने रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट करते त्यामुळे नवीन प्रकल्प सहभागी होण्यास पात्र आहेत
  • 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचा उत्पादन प्रकल्प किंवा पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचा सेवा प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान आठवी इयत्तेची शैक्षणिक पात्रता बंधनकारक राहील
  • ज्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे आहे आणि त्यांना यापूर्वी कोणतेही सरकारी अनुदान मिळाले नाही अशा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • विज बिल
  • भाडेकरार
  • जागेची कागदपत्रे
  • मशीनची कोटेशन
  • PMEGP पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रिंट
  • स्वयं गुंतवणूक उपलब्ध असल्याचा पुरावा
  • प्रकल्पानुसार इतर कागदपत्रे

PMEGP Loan Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

  • PMEGP Loan Yojana 2024 सर्वप्रथम PMEGP या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करायचे आहे
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म अचूक पूर्ण करण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि सर्व आवश्यक तपशील तुमच्या सर्वोत्तम माहितीनुसार भरले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे
  • सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर भरलेला फॉर्म जतन करण्यासाठी सेव्ह एप्लीकेशन डेटा यावर क्लिक करायचे आहे
  • तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज अंतिम सबमिशन साठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड अर्जासह नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर पाठवला जाईल PMEGP Loan Yojana 2024

pmegp loan बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 thought on “असे घ्या व्यवसाय सूरु करण्यासाठी PMEGP कर्ज ; या लिंक द्वारे करा अर्ज : PMEGP Loan Yojana 2024”

Leave a comment