Pnb fd scheme : गुंतवणूक करणे ही काळाची अत्यंत महत्त्वपूर्ण गरज आहे. आपण आपल्या दैनंदिन कमाई मधील थोडा हिस्सा का होईना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक ही आपल्या अडचणचे वेळी आपल्याला उपयोगी पडणारी रक्कम आहे. गुंतवणुकीची सवय आपल्याला अतिरिक्त खर्चापासून देखील वाचवु शकते. शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल किंवा नोकरदार असेल या सर्वांनाच आपली गुंतवणूक असावी. किंवा आपल्याकडं कॅश मधील शिल्लक भांडवल असावं अशी अपेक्षा सर्वांचीच असते.
गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये फिक्स डिपॉझिट हा एक अत्यंत सुरक्षित असा गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. आज आपण अशाच एका गुंतवणुकीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बराच वेळा नागरिकांना बँकांनी तयार केलेले काही नवीन उपक्रम माहीत होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा देखील मिळवता येत नाही. आज आपण राष्ट्रीयकृत बँक पंजाब नॅशनल या बँकेची एक खास गुंतवणूक स्कीम पाहणार आहोत pnb FD scheme .

pnb fd scheme काय आहे खास.
सध्या बँकेकडून फिक्स डिपॉझिट करणाऱ्या नागरिकांना सात टक्क्यापर्यंत व्याजदर दिले जाते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्रस्थान म्हणून साडेसात टक्के वार्षिक व्याजदर देण्यात येतो. याच नियमानुसार पंजाब नॅशनल बँक मध्ये तुम्ही तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांची (pnb FD scheme) एफ डी केली तर तुम्हाला बँकेकडून एकूण 2,46,287 रुपये एवढी रक्कम प्राप्त होईल.
याच ठिकाणी जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल आणि आपण तीन वर्षासाठी पंजाब नॅशनल बँक मध्ये दोन लाख रुपयांची एफडी केली तर आपल्याला 7.5% व्याजदराने तीन वर्षानंतर दोन लाख 49 हजार 943 रुपये एवढा लाभ मिळेल. यामध्ये तुम्हाला 49 हजार 943 रुपये एवढी रक्कम व्याज स्वरूपात मिळेल.pnb FD scheme
हे वाचा : 1 एप्रिल पासून बदलणार नवीन नियम; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम.
जोखीम नाही
बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना जोखीम घ्यावी लागत नाही. जसे आपण म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा अन्य इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला जशी जोखीम शिकावी लागते. तशी एफडी या गुंतवणुकीमध्ये आपल्याला जोखीम स्वीकाराची आवश्यकता नाही. सर्व राष्ट्रीयकृत बँकेवर सरकारचे आणि आरबीआयचे नियंत्रण असते. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कोणत्याही प्रकारची ग्राहकांची किंवा नागरिकांची फसवणूक करत नाही. ज्याप्रमाणे व्याजदराची अंमलबजावणी केली जाते. आणि ज्याप्रमाणे रक्कम पूर्ण केली जाते ती रक्कम ग्राहकांना वितरित करण्याचे काम बँकेकडून केलं जातं.
एफडी (pnb FD scheme) मध्ये गेली गुंतवणूक जोखीम मुक्त असतेच. ही रक्कम काही ठराविक काळानंतर ठेवेदारांना व्याजासहित परत मिळते. यामुळे या गुंतवणुकीला गुंतवणूकदार खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतात. यामध्ये बँका काही ज्येष्ठ नागरिक महिला विधवा अशा ग्राहकांना खास व्याजदर देखील वितरित करतात. ज्यामुळे त्यांना गुंतवणूक करण्याचा अधिक फायदा प्राप्त होतो. काही एफडी सुविधांमध्ये आपल्याला टॅक्स सेविंग देखील करता येते. ज्या गुंतवणुकीमध्ये आपण पाच वर्षासाठी रक्कम भरली आहे त्या ठिकाणी आपल्याला व्याजासोबतच टॅक्स मधून देखील बचत मिळवता येते.pnb FD scheme
FD वर कर्ज देखील मिळते
आपण राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एफडी केलेली असताना आपल्याला अचानक काही प्रमाणात रक्कम लागली तर बँका आपल्या एफडीवर आपल्याला कर्ज देखील वितरित करतात. या कर्जावर देखील बँक व्याज आकारतेच. परंतु अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला बँकेकडून तात्काळ कर्ज स्वरूपात रक्कम मिळू शकते. त्यामुळे एफ डी मधील गुंतवणूक या सारखे अनेक फायदे गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देते.
पंजाब नॅशनल बँकेच्या या व्याजदराच्या अनुषंगाने तीन वर्षासाठी जर आपण दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सरासरी 50 हजार रुपयांचा अधिक लाभ बँकेकडून वितरित केला जातो. कोणतेही गुंतवणूक करण्याआधी आपण आपल्या संबंधित तज्ञाकडून त्याची माहिती व खात्री घेऊनच गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना आपली फसवणूक होणार नाही किंवा आपण गुंतवलेली रक्कम भविष्यात आपल्याला धोक्याची निर्माण होणार नाही याची सर्व खात्री आणि चौकशी करूनच गुंतवणूक करावी. करण गुंतवणुकी मधून मिळणाऱ्या लाभापेक्षा जास्त महत्त्वाची आपण गुंतवणूक केलेली रक्कम असते. तर गुंतवणूक केल्या रकमेलाच इजा पोहोचली तर आपल्याला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. pnb FD scheme