Pradhan Mantri Awas Yojana :आता सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; पुण्यातील या भागात दिले जाणार घरे.

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहेत. महापालिकेने आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे महापालिका धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा,बालेवाडी,वडगाव खुर्द या भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी केलेली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बळ घटकांतील नागरिकांना अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांच्या हक्काचे घर मिळावे असा या योजने मागचा उद्देश आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने घराचे स्वप्न पूर्ण केले

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने 2 हजार 918 घरे बांधून प्रदान केले आहेत. यामध्ये पहिला टप्प्यात वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर या भागामध्ये महापालिकेने या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांतील नागरिकांना हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

पंतप्रधान आवास योजना 2.0

राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना 0.2 ची घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरासाठी नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या . पण मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया थांबलेली होती.

नोंदणी प्रक्रिया सुरू

पंतप्रधान आवास योजना 2.0 ची घोषणा करण्यात आल्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यामुळे या योजनेअंतर्गत नोंदणीक प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेने अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे .त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांसाठी ही एक मोठी संधी आहे .

Pradhan Mantri Awas Yojana 300 कोटी रुपयांचा खर्च

पंतप्रधान आवास योजना 2.0 साठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही घरे धानोरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द,बालेवाडी येथे ही घरी बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी 4 हजार 176 घरे बांधण्यासाठी महापालिकेला 300 कोटी रुपये खर्च येणार आहे.नागरिकांसाठी या योजनेतून 300 चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहेत .

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

हे वाचा: पीएम आवास योजना महत्वाच्या 10 अटी

Pradhan Mantri Awas Yojana कोणकोणते कागदपत्रे लागतात

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना काही कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे.

महापालिकेचा संदेश

पुणे महापालिकेचे शहर अभियंता, प्रशांत वाघमारे यांचे म्हणणे आहे की, या योजनेअंतर्गत महापालिकेच्या जागेवर घर बांधल्याने जमिनीचा खर्च नाही. यामुळे हे घर नागरिकांना कमी किमतीत देणे शक्य होईल. त्यामुळे, आर्थिक दुर्बळ घटकांतील नागरिकांसाठी हे एक मोठे संधीचे क्षण आहे. इच्छुक नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

या योजनेद्वारे पुण्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे आणि त्यांना कमी किमतीत आपले घर मिळविण्याची सुवर्णसंधी मिळेल . Pradhan Mantri Awas Yojana.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment