Rain Alert : देशात पुन्हा एकदा हवामानाबद्दल होणार आहे. ईशान्य भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना हवामान खात्याने पावसाचा इशारा वर्तवला आहे. येत्या 24 तासात अनेक भागांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे असे IMD सांगितले आहे. येत्या 24 तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होणार आहे. असा हवामान खात्याने इशारा दिला आहे .आयएमडीनुसार, एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. याचा परिणाम येथे दोन ते तीन दिवसांमध्ये दिसून येऊ शकतो, यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.Rain Alert

उत्तर भारतातील राज्यांत हीटवेव्ह अलर्ट
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अंदाजानुसार दिल्ली सह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. IMD चे शास्त्रज्ञ डॉ . नरेश कुमार म्हणाले, गुजरात मध्ये मागील एक आठवड्यापासून उष्णतेची लाट आहे. IMD ने याबद्दल रेड अलर्ट दिला होता.IMD ने , वायव्य भागातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा आजही इशारा करण्यात आला आहे. एक ते दोन दिवसांमध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढेल, असे हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहील. मात्र येत्या 24 तासामध्ये अचानक बदल होऊ शकतो. असा हवामान खात्याने इशारा दिला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली येथे अचानक हवामान बदल होऊ शकतो.
हे वाचा : गव्हाला मिळतोय चांगला दर… पहा आजचे गव्हाचे बाजार भाव!!
पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसणार
एक नवीन पश्चिमी विक्षोभ ॲक्टिव होत आहे.असा अंदाज हवामान खात्याने वर्ततवला आहे. 10 एप्रिल पर्यंत पूर्णपणे सक्रिय होऊ शकते. त्यामुळे उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पश्चिम विक्षभामुळे ,पश्चिम आणि उत्तर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तसेच गडगडाटसह ,वारे आणि हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता आहे.येथे एक ते दोन दिवसांमध्ये दिल्ली,पंजाब,हरियाणा,उत्तराखंड,अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश मध्ये त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे . Rain Alert
देशभरातील हवामान अंदाज
पश्चिम व मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या काही तासांत ते पश्चिम व मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता आहे . यानंतर, हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-ईशान्येकडे वळू शकते. येत्या 24 तासांमध्ये मध्ये बंगालच्या खाडीवर हे हळूहळू कमी होऊ शकतं. या प्रणालींच्या प्रभावामुळे, अनेक भागात पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. Rain Alert
कोणत्या राज्यात पडणार पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार , 9 ते 11 एप्रिल या दिवसामध्ये पूर्व आणि ईशान्य भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, कराईकल ,केरळ, माहे, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य भारतात वादळीवाऱ्या सह पाऊस, ढगांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची आंदज आहे.
imd ने दिलेल्या माहितीनुसार , या भागात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर असू शकतो. अनेक भागात हलक्या ते जोरदार पावसाची (Rain Alert) शक्यता वर्ततावली आहे .
आज 10 एप्रिल रोजी बिहार तसेच अरुणाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, येत्या 2 ते 3 दिवसात उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि 9 ते 11 एप्रिल रोजी आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. Rain Alert