Ratan Tata : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले.

Ratan Tata : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले. दिनांक 9 ऑक्टोम्बर रोजी देशाचे महान उद्योजक व सामाजिक कार्य करणारे महान व्यक्ति रतन टाटा यांचे मुंबई येथे निधन झाले.

निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्या सोबतच सर्वच माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धाजली अर्पण केली जात आहे.

हे पण वाचा:
Tur Kharedi
Tur Kharedi: तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी…!

पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे
आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला.

टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत.

रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा त्यांचा केंद्रबिंदू होता,हे त्यांच्याशी संवाद साधताना नेहमी लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही. त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.

हे पण वाचा:
farmer scheme update शेतकऱ्यांना धक्का! या योजनेच्या निधी वाढीला सरकारचा ब्रेक. farmer scheme update

रतन टाटा हे नाव संपूर्ण भारत देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते. उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते.

Ratan Tata यांच्या बद्दल थोडी माहिती.

Ratan Tata यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. टाटा समूहाची स्थापना करणारे जमशेदजी टाटा यांचे ते नातू आहेत. मोठे होऊन रतन टाटा यांनी सुरुवातीची वर्षे तुलनेने निवाऱ्याच्या वातावरणात घालवली, पण कठोर परिश्रम, शिस्त आणि सहानुभूतीचे महत्त्व त्यांना सुरुवातीपासूनच समजले. त्यांनी आपल्या शैक्षणिक शोधात कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरचा अभ्यास केला, परंतु तेथे अॅडव्हान्समॅनेजमेंट प्रोग्राम घेऊन हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी देखील बनले. १९६२ मध्ये ते भारतात परतले आणि टाटा समूहातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांच्या नेतृत्वाचा कालखंड टाटा समूहाच्या, विशेषत: नाविन्यपूर्ण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाचा होता. भारतातील मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा नॅनोचा विकास हा त्यांचा ऐतिहासिक प्रकल्प होता. असे करताना नॅनो हे सर्वसामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी टाटांचे प्रतीक बनले

हे पण वाचा:
Maharashtra Weather Update Maharashtra Weather Update राज्यात वादळी वारा गारपीट तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील तीन ते चार दिवस हवामान कसे? IMD चा अंदाज

साधे राहणीमान आणि विनम्रता

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही Ratan Tata यांची जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्व साधे आणि साधेपणा दर्शविणारे आहे. ऐशोआरामाचे ठळक प्रदर्शन करण्यासाठी तो ओळखला जात नाही. मोठमोठ्या हवेलींमध्ये राहणाऱ्या इतर उद्योगपतींच्या तुलनेत टाटा दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याचं घर समाधानकारक आहे आणि इतर अब्जाधीशांच्या घराजवळ नक्कीच नाही.

Ratan Tata यांचे सामाजिक कार्य

परोपकार हा रतन टाटांच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे. टाटा समूहाची ६० टक्क्यांहून अधिक संपत्ती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आहे, ज्याचा उपयोग शिक्षण, आरोग्यसेवा, ग्रामीण भारताचा विकास आणि असंख्य सामाजिक कारणांसाठी केला जातो. अधिक न्याय्य आणि समतावादी समाजाची टाटा कुटुंबाची दृष्टी पुढे नेणाऱ्या परोपकाराच्या या उपक्रमांमध्ये रतन टाटा यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

Ratan Tata यांचा 28 डिसेंबर 1937 व मृत्यू 9 ऑक्टोम्बर 2024 या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात तर बाजी मारलिच परंतु सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला. रतन टाटा अश्या या महान व्यक्ति ने आज अखेरचा श्वास घेऊन देशातील सर्व माध्यमातील नागरिकांच्या डोळ्यात अश्रु आणले, हे असे महान व्यक्तिमहत्व भारत देशला परत लाभावे हीच अपेक्षा.

हे पण वाचा:
Solar Krushi Pump Yojana Solar Krushi Pump Yojana सौर कृषी पंप योजना, मात्र शेतकरी या योजनेविषयी नाराज… काय आहे कारण? पहा सविस्तर.

महान व्यक्ति महान रत्न रतन टाटा यांना मराठी तंत्रज्ञान माहितीmd tech tatinic कडून भावपूर्ण श्रद्धाजली..

1 thought on “hsc ssc result date : या दिवशी लागणार 10 वी आणि 12 वी 2025 चा निकाल.”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS