रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात 66104 लाभार्थ्याची यादी तपासा
या रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात, सरकारचा निर्णय
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून या रेशन कार्ड धारकांना साडी ही भेट वस्तू दिली जाणार आहे . या आगोदर राज्य सरकारने रेशन कार्ड लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर ही भेट बंद करण्यात आली होती. परंतु परत आत्ता अचारसंहिता शिथिलता झाल्यामुळे साडी वाटपाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे .
या कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यामधील 66,104 अंत्योदय रेशन कार्ड धारकांना हे साडी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना भंडारा जिल्ह्यामध्ये लाल, हिरवा, पिवळा, निळ्या अशाच्या रंगाच्या साड्या आता या शासनाच्या माध्यमातून या रेशन कार्डधारकांना मिळणार आहे.
रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात लाभ कोठे मिळणार?
अंत्योदय रेशन कार्ड धारकांना या साडी वाटपाचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे.
पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना प्रणालीवर आधारित यंत्राचे करण्यात आले आहे. याचा नवीन यंत्रावर साडी वितरित केल्याची नोंद करण्यात येणार आहे. या अगोदर ज्या रेशन कार्ड धारकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे अशा रेशन कार्ड धारकांना आता या कार्यक्रमाचा लाभ दिला जाणार नाही, त्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचा लाभ राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॉव्टिव्ह मार्केट योजना आहेसदर योजनेचा कालावधी सण 2023 ते 28 या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आले येत आहे.
रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात लाभार्थी
- राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाची संख्या 24,58,747 इतकी आहे.
- दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धार कुटुंबांच्या संख्येत वाढ/ घट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्याच्या संकेत वाढ/घट होणार आहे.
- अंत्योदय शिधापत्रिका धार कुटुंबांना जिल्ह्यातील सुमारे 66 हजार आणि रेशन कार्डधारकांना यातील 60% लाभार्थ्यांना साडी वाटपाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे उर्वरित साडी वाटपाचा कार्यक्रम ही आता सुरू करण्यात आलेला आहे. पिवळी रेशन कार्ड धारकांनी याचा लाभ घ्यावा .