Ration card update : देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणतेही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं तर अगोदर रेशन कार्ड लागते. तसेच गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्डद्वारे मोफत धन्य देण्यात येते. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेअंतर्गत कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळावेत यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड धारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे. Ration card update

रेशन कार्ड केवायसी
रेशन कार्ड धारकांसाठी आता केवायसी करण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहे. म्हणजेच 30 एप्रिल 2025 च्या पूर्वी रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य आहे अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकतात. यापूर्वी रेशन कार्ड धारकांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा अनेक नागरिकांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यामुळे तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर 30 एप्रिल अगोदर केवायसी करून घेणे बंधनकारक आहे.Ration card update
हे वाचा : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी मिळणार 500 कोटींचे अनुदान..!
या शिधापत्रिका धारकांना मिळणार नाही मोफत धान्य.
आता शिधापत्रिका धारकांना केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे केवायसी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने केवायसी करू शकतात. ज्या नागरिकांनी केवायसी केली आहे त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ बंद होणार आहे. केवायसी न करणाऱ्या नागरिकांचे शिधापत्रिका वरून नाव काढण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. शेवटचे 4 दिवस राहिले आहेत त्या अगोदरच तुम्ही रेशन कार्ड केवायसी करून घ्यावी.Ration card update
रेशन कार्ड केवायसी ऑनलाईन पद्धतीने कशी करावी ?(Ration card KYC online process)
- रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Aadhaar FaceRD ॲप डाऊनलोड करून घ्यायच आहे.
- यानंतर तुमची लोकेशन टाकून घ्यायचे आहेत
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर , कॅप्चा आणि ओटीपी टाकून घ्यायचा आहे
- ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला face-e-KYC ऑप्शन निवडून घ्या.
- त्यानंतर तुमचा फोटो अपलोड होईल.
- फोटो अपलोड झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन केवायसी करू शकतात ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने केवायसी करता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने पण केवायसी करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. ऑफलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात जाऊन देखील रेशन कार्ड केवायसी करून शकतात. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाताना आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जावे लागेल.Ration card update
1 thought on “Ration card update: आता फक्त उरले शेवटचे 4 दिवस! लगेच करा हे काम अन्यथा रेशन कार्ड होणार बंद…”