ration kyc : केंद्र शासनाच्या अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सर्व रेशन धारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ज्या ग्राहकांनी व रेशन धारकांनी केवायसी केली नाही; त्या रेशन धारकांचे रेशन पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याची सूचना देखील देण्यात आली आहे. बऱ्याच रेशन धारकांना kyc कोठे करायची व केवायसी केल्यानंतर केवायसी यशस्वी झाली आहे का ? हे कुठे पाहायचं याची कल्पना नाहीये. त्यामुळे आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण रेशन धारकांनी केवायसी पूर्ण केल्यानंतर केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही हे कुठे पाहायचं याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
रेशन कार्ड केवायसी (ration kyc) का आहे महत्त्वाची.
अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने देशातील सर्वच रेशन कार्डधारकांना आपली केवायसी करणे बंधनकारक केले आहे. आता ही kyc करणे का बंधनकारक केले आहे, किंवा केवायसी करणे का गरजेचे आहे. हे आधी आपण जाणून घेऊया . बऱ्याच रेशन धारक कुटुंबामध्ये मयत व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत. त्या मयत व्यक्तींना देखील रेशनचा लाभ मिळत आहे.
या केवायसीच्या माध्यमातून रेशन कार्ड मध्ये जे मयत व्यक्तींची नावे असतील ती नावे केवायसी च्या माध्यमातून डिलीट केले जातील. कारण ज्या व्यक्तींची बायोमेट्रिक आधारित केवायसी होणार नाही त्या व्यक्तींची नावे रेशन कार्ड मधून डिलीट करण्यात येतील. यामुळे रेशन कार्ड अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपली केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हे वाचा: दिवाळीच्या सणानिमित्त मोफत रेशन आणि अजून 5 सुविधा मिळणार
कुठे करावी लागेल kyc
kyc करण्यासाठी रेशन धारकांना आपल्या जवळील रेशन दुकानांमध्ये जाऊन आपली केवायसी पूर्ण करावी लागेल. केवायसी करताना रेशन धारक कुटुंबामध्ये जेवढे सदस्यांची नावे आहेत, त्या सर्व सदस्यांना केवायसी करण्यासाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. कारण ही केवायसी बायोमेट्रिकच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे जर आपण अजून केवायसी केली नसेल तर आपल्या जवळील रेशन वाटप दुकानात जाऊन आपली केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्या.
kyc झाली आहे किंवा नाही हे कसे पहावे
बऱ्याच नागरिकांनी केवायसी करून देखील आपली केवळ यशस्वी झाली आहे किंवा नाही हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे त्यामुळे आज आपण आपली केवायसी झाली आहे किंवा नाही हे कसे तपासायचे याबद्दलची माहिती पाहूया.
- सर्वप्रथम आपल्याला मेरा रेशन २.० हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर जर आपण पहिल्यांदा हे ॲप वापरत असाल तर आपल्याला नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण परत आपला आधार क्रमांक टाकून आधार वरील ओटीपी घेऊन आपण लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असणारे सर्व नावे दाखवली जातील.
- ज्या रेशन कार्ड धारकांची केवायसी झाली आहे त्यांच्या नावाच्या समोर आधार स्टेटस मध्ये व्हेरिफाइड (Verified) असं नाव येईल.
- ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्या नावाच्या समोर आधार स्टेटस मध्ये नॉट व्हेरिफाईड (Not Verified) असं नाव प्रदर्शित होईल.
यामध्ये ज्या रेशन धारकांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे. त्यांच्या नावाच्या समोर आधार स्टेटस मध्ये व्हेरिफाइड असं नाव येतं. परंतु ज्या नागरिकांनी आपली kyc पूर्ण केली नाही किंवा त्यांची केवायसी यशस्वी झाली नाही त्यांच्या नावाच्या समोर या ठिकाणी नॉट व्हेरिफाइड असा मेसेज आपल्याला दिसून येईल. ज्यांच्या नावाच्या समोर हा पर्याय दिसत आहे त्यांनी आपली केवायसी तात्काळ करून घ्यावी. जेणेकरून रेशन कार्ड मधून आपले नाव डिलीट होणार नाही किंवा आपल्याला लाभ मिळणे बंद होणार नाही.