Ration kyc : देशातील सर्व नागरिकांना रेशन कार्ड ची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. अद्याप पर्यंत बऱ्याच नागरिकांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाही. त्या नागरिकांना केवायसी करण्यासाठी सरकारकडून मोबाईलच्या माध्यमातून केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यांनी आपली केवायसी केली नसेल त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

अशी करा मोबाईल च्या माध्यमातुन kyc
नागरिकांना घरबसल्या आपले रेशनचे केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता नागरिक राष्ट्रभाव दुकानावर न जाता घरबसल्या आपल्या रेशन कार्डची (Ration kyc) ई-कवायसी करू शकतील. केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये मेरा एक केवायसी ॲप व आधार फेस आरडी सर्विस ॲप हे दोन एप्लीकेशन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप मध्ये आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या आधार क्रमांक एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपण आपला फोटो घेऊन आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता. Ration kyc
हे वाचा : घरबसल्या करता येणार केवायसी : अशी करा रेशनची केवायसी आपल्या मोबईल वरुन.
kyc स्थिती कशी तपासावी
नागरिकांचे केवायसी झाली आहे किंवा नाही हे कसे तपासावे. आपल्या मोबाईल मध्ये आपण ई-केवायसी ॲप डाऊनलोड करा . ॲप डाऊनलोड https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth&hl=hi केल्यानंतर त्या ॲपमध्ये आपला आधार नंबर टाकून ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आपल्या आधार लिंक मोबाइल क्रमांक वर आलेला ओटीपी भरल्यानंतर आपल्यासमोर नवीन स्क्रीन ओपन होईल. या स्क्रीनमध्ये आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर दाखवला जाईल. त्याच्याच खाली आपल्याला रेशन कार्ड ई-केवायसी स्थिती हा पर्याय दिसेल. या मध्ये आपल्याला Y दिसत असेल तर आपली kyc (Ration kyc) पूर्ण झालेली आहे. जर या ठिकाणी काही दिसत नसेल तर आपली kyc करणे बाकी आहे.
मोबाईलच्या माध्यमातून केवायसी करण्याची प्रक्रिया ही फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. बाहेरील राज्यातील नागरिकांना या माध्यमातून रेशन कार्डची (Ration kyc) केवायसी करता येत नाही. जर आपले नाव महाराष्ट्राचे अंतर्गत रेशन कार्ड ला जोडलेले असेल तर आपण या माध्यमातून आपली केवाशी पूर्ण करू शकता. यासोबतच आपण आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन देखील आपली केवायसी पूर्ण करू शकता.
रेशन कार्ड अंतर्गत जेवढ्या लाभार्थ्यांची नावे रेशन मध्ये जोडलेली आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. जर कुटुंबातील एखादा सदस्य केवायसी करायचा बाकी असेल तर त्या सदस्यांनी आपली केवायसी करून घ्यावी अन्यथा आपल्याला बंद केला जाईल. Ration kyc