Khadde takrar : पावसाळ्यामध्ये बऱ्याच रस्त्यावर खड्डे पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्या खड्ड्याबाबत तक्रार कुठे करावी हा देखील आपल्या मनात प्रश्न निर्माण झालेला असतो. आता सरकारकडून एक नवीन ॲप तयार करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून आणि पोर्टलच्या माध्यमातून आपण रस्त्यावर खड्ड्याबबत (Khadde takrar) तक्रार नोंदवू शकता. की तक्रार कशी करायची कोणत्या आजच्या माध्यमातून करता येते याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक अपघात झाल्याचे आपण पाहिले आहे. अपघातातील 50% अपघात हे रस्त्यावरील खड्ड्यामुळेच घडतात असं अनेक अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झाला आहे. या खड्ड्या बाबत तक्रार कोठे करावी किंवा हा खड्डा दुरुस्त करण्याबाबत अनेक नागरिक सतर्कतेने प्रयत्न करतात. परंतु याबाबत त्यांना हवा असा प्रतिसाद किंवा माहिती मिळत नाही. यामुळेच सरकारकडून या खड्ड्याबाबत तात्काळ (Khadde takrar) कारवाई व्हावी आणि सरकारला खड्ड्याची माहिती मिळावी याकरिता सरकारकडून खड्ड्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. पोर्टल सोबतच मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आलेले आहे. पोर्टलवरून तसेच ॲपच्या माध्यमातून देखील नागरिक आपल्या दळणवळणाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची तक्रार ऑनलाइन पद्धतीने नोंदवू शकतात.
हे वाचा: नवीन दुचाकी खरेदी बाबत सरकारचा मोठा निर्णय; दोन हेल्मेट देणे होणार बंधनकारक.
या ॲप च्या माध्यमातुन नोंदवता येते तक्रार
प्ले स्टोअरवर pcrs या नावाचं ॲप उपलब्ध आहे. हे ॲप सरकारकडून तयार करण्यात आलेले आहे. हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपण या ॲपच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची तक्रार सरकारकडे नोंदवू शकता. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ॲप मध्ये ऑटोमॅटिक लोकेशन घेतलं जातं. या लोकेशन च्या साह्याने आपण खड्ड्याचा फोटो आणि खड्ड्याची (Khadde takrar) तक्रार ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता. ॲप सोबतच सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पीडब्ल्यूडी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील आपण खड्डेबाबतची तक्रार नोंदवू शकता. Khadde takrar
खड्डे तक्रार निवारण
खड्ड्याची ऑनलाईन (Khadde takrar) तक्रार सादर केल्यानंतर. या खड्ड्या बाबतची सद्यस्थिती देखील नागरिकांना पाहता येते. ऑनलाइन तक्रार सादर केल्यानंतर तातडीने शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे या तक्रारीची माहिती पाठवली जाते. कार्यालयाला माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाकडून तात्काळ या खड्ड्या बाबत कारवाई करून खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. खड्ड्याचे काम पूर्ण केल्यानंतर खड्डा दुरुस्त केल्याची माहिती देखील ॲप मध्ये आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते. महाराष्ट्र राज्याला खड्डे मुक्त रस्ता करण्यासाठी हा एक सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललेला महत्त्वाचं पाऊल आहे. Khadde takrar