ration shop update राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. या रेशन कार्ड धारकांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी येत्या 01नोव्हेंबर पासून त्यांच्या विशेष मागण्यासाठी संप करण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांचा हा संप आता मागे घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे सर्वसामान्य रेशन धारकांना दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा आणि इतर लाभ वितरित करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
रेशन धारक दुकांदारचा संप मागे घेतल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी निमित्त मिळणारा आनंदाचा शिधा असेल किंवा इतर लाभ असेल तो मिळणार आहे. या मुळे राज्यातील गरीब रेशन धारक कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी होईल.
ration shop update.का पुकारला होता संप
महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानदारांनी संपर्क करण्याचे नियोजन केले होते त्यांच्या मुख्य मागण्या होत्या त्यामध्ये धान्य वाटपमद्धे 300 रुपये कमिशन देण्यात यावे व दुसरी मागणी त्यांची होती आनंदाच्या शिधा वाटप करताना प्रति संच 15 रुपये या प्रमाणात कमिशन देण्यात यावे. यासोबतच त्यांच्या आणखी काही मागण्या साठी संप पुकारण्यात आला होता.
का घेण्यात आला संप मागे
दिवाळीच्या सणांमध्येच स्वस्त राशन दुकानदाराने संप पुकारला होता या संपाच्या सर्वसामान्य नागरिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार होता. त्यामुळे अन्नधान्य पुरवठा विभागाचे सचिव रणजीत सिंग देवल यांनी मध्यस्थी करत सध्या आचारसंहिता असल्यामुळे आपल्या मागण्या मान्य करता येणार नाहीत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आपण आपल्या मागण्या घेऊन या. या पद्धतीची मध्यस्थी करत रेशन धान्य दुकानदारांचा नियोजित संप रद्द करण्यात यावा अशा सूचना दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
1 thought on “रेशन धारकांची दिवाळी होणार गोड ! ration shop update.”