RTE News : आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना आरटीई अंतर्गत (RTE Admission) खाजगी इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश दिला जातो . त्यासाठी सरकारकडून प्रतिविद्यार्थी प्रतिपूर्ती दिली जाते . मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील खाजगी (Private schools) शाळांची रक्कम शासनाकडे थकीत होते .मात्र, यावर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी सरकारकडून 58 कुठे ८० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे .यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीची थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यामुळे खासगी इंग्रजी शाळांना (Private schools) मोठा दिलासा मिळाला आहे.RTE News

शाळा व संस्थाचालकांना दिलासा मोठा दिलासा
राज्यातील अनेक शाळांनी आरटीई (RTE Admission) प्रवेश केला होता,परंतु शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेवर मिळाली नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन अडचणीत आले होते .अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती रक्कम वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही उशीर होत होता .तेवढेच नाही तर काही संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांकडून 100 टक्के रक्कम घेण्याचा पवित्रा हाती घेतला होता. मात्र, सरकारने हा निधी मंजूर करून शाळा व संस्थाचालकांना मोठा दिलासा दिला आहे.RTE News
हे वाचा : राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षण मंत्र्यांची घोषणा
शासनाकडे १७०० कोटी रुपये थकीत
शासनाच्या निर्णयानुसार, आरटीई अंतर्गत खाजगी (Private schools) इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश (RTE Admission) दिला जातो . यापोटी सरकारकडून प्रति विद्यार्थी 17 हजार 660 रुपये संबंधित संस्थेला प्रतीपूर्ती म्हणून देण्यात येते .या निर्णयामुळे आता शाळांना मदत मिळणार आहे .तसेच दिलेल्या आरटीई प्रवेशांची प्राति पूर्ती होणार आहे .आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी काही संस्थाचालकांच्या मते, अजून शासनाकडे जवळपास 1700 कोटी रुपये थकीत बाकी आहे .देण्यात आलेली ही रक्कम फक्त सण 2022-23 आणि 2023-24 या वर्षाच्या थकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी वितरीत करण्यात येत आहे .त्यामुळे राहिलेली रक्कम शासनकडून कधी देण्यात येणार याकडे शाळा व संस्थाचालकांचे लक्ष लागून आहे. RTE News
शिक्षण विभागाने संस्थाचालकाना आवाहन
दरम्यान, या निधीचे जिल्हास्तरावर वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी शाळांनी आपले आवश्यक कागदपत्रे आणि माहिती वेळेत जमा करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.RTE News