Salokha yojana: शेत जमिन वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना: जमिनीची अदलाबदली!!

Salokha yojana : सरकारने शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी राज्यात सलोखा योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत जमिनी संदर्भात निर्माण होणारे वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सलोखा योजनेसाठी राज्य शासनाने कालावधी वाढ दिला आहे. सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वर्षात कालावधी वाढ मिळाला आहे. Salokha yojana

Salokha yojana

सलोखा योजनेअंतर्गत जमिनीचे कोण – कोणते वाद मिटवले जातात ?

जमिनीचे अनेक प्रकारचे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकाराचे वाद निर्माण झालेले आहेत:-

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
  • शेतजमीन रस्त्याचे वाद
  • शेतजमीन बांधावरून होणारे वाद
  • शेतजमीन मालकी हक्काबद्दलचे वाद
  • शेत जमिनीवर ताबा नसल्याचे वाद
  • अभिलेखाचे चुकीचे नोंदीमुळे निर्माण झालेले वाद
  • क्षेत्र मोजणीवरून निर्माण झालेले वाद
  • शेतजमीन अतिक्रमणावरून निर्माण झालेले वाद
  • भाऊ बांधवातील वाटणी मुळे निर्माण झालेले वाद
  • शासकीय चुकीचा प्रस्ताव सादर झालेले निर्माण झालेले वाद

या व अशा विविध प्रकारच्या वादासंबंधी पर्याय उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने सलोखा योजना (Salokha yojana) सुरू केलेली आहे.

हे वाचा : तुम्ही तुमच्या सातबारावर शेतातील झाडे, बोअरवेल आणि विहिरीची नोंद केली नाही का? तर अशी करा घरबसल्या मोबाईलवर नोंदणी

काय आहे सलोखा योजना

शेती संबंध निर्माण होणारे वाद हे अत्यंत किचकट स्वरूपाचे असतात. त्यामुळे न्यायालयाला देखील निकाल देण्यासाठी अनेक वर्ष वेळ लागतो. यामुळे शेतकऱ्यांचे वाद गगनाला भिडताना पाहायला मिळतात. ज्यामुळे सरकारने सलोखा योजना (Salokha yojana) निर्माण करून शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी मोहीम हाती घेतली. सलोखा योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांचा ताबा असलेली जमीन आणि नावावर असलेली जमीन यामध्ये अदलाबल बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक हजार रुपये शुल्क भरून आपली जमीन आपले नावावर करून घेता येते.

20250414 143631

शेतकऱ्याच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्याच्या नावावर नसल्यामुळे अनेक वाद निर्माण झालेली पाहायला मिळत आहेत. यावरच उपाय म्हणून शासनाने सलोखा (Salokha yojana) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आपल्या ताब्यात असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या अदलाबदलीच्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क 1000 रुपये व नोंदणी फीस एक हजार रुपये या प्रमाणात शुल्क भरावा लागतो. शेतकऱ्यांना लागणारा अधिकचा शुल्क सलोखा योजनेच्या माध्यमातून माफ केला जातो.Salokha yojana

1 thought on “Salokha yojana: शेत जमिन वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना: जमिनीची अदलाबदली!!”

Leave a comment