Satbara Utara :जमीन खरेदी केल्यानंतर…25 दिवसात होणार सातबारा उताऱ्यावर नोंद..! ते कसे ?

Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची प्रक्रिया ही पारंपारिक नागरिकांसाठी एक प्रकारची झंझट आणि वेळ खाऊ प्रक्रिया होते . पूर्वी जमीन खरेदी केल्यानंतर ,संबंधित नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपल्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव नोंदणीची प्रक्रिया करावी लागत होती .यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालय मध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागायच्या ,अनेक वेळ बसावं लागत होतं .अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत होता.पण आता राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे.त्यानुसार आता जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर नाव लावण्याची प्रक्रिया आता 25 दिवसाच्या होणार आहे .Satbara Utara

Satbara Utara

महसूल विभागाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

महसूल विभागाने आता नोंदणी विभागाच्या आया सरिता आणि भूमी अभिलेख विभागाच्या ई-फेराफार या दोन संगणक प्रणाली जोडण्यात आल्या आहे .त्यामुळे आता जमीन खरेदी नोंदणीची प्रक्रिया जलद गतीने झाली आहे .यामुळे संबंधित नागरिकांना आता कोणतेही कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाही .

दस्त नोंदविल्यानंतर,संबंधित माहिती ऑनलाईन पद्धतीने फेरफार नोंदणीसाठी उपलब्ध केली जाईल. आता या प्रणालीमुळे 25 दिवसाच्या आत सातबारा उताऱ्यावर संबंधित व्यक्तीचे नाव नोंदविले जाईल .Satbara Utara

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

हे वाचा : शेत जमिन वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना: जमिनीची अदलाबदली!!

आय सरिता प्रणाली ही नेमकी काय आहे

ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अंतर्गत आहे.मुद्रांक शुल्क विभाग अंतर्गत प्रणाली मध्ये खरेदी-विक्री,हक्क सोड,बोजा कमी करणे किंवा वाढविणे या सर्व प्रक्रियेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जाते.दस्त नोंदविल्यानंतर,सर्व माहिती म्हणजे जसे की खरेदी -विक्री करणाऱ्या व्यक्तींचे नाव,जमिनीचे क्षेत्र,जमिनीचे मूल्य आणि तारीख या याचा मजकूर तयार करून त्या सर्व माहितीला ई फेरा फार प्रणालीला पाठवण्यात येते .पाठवण्यात आल्यानंतर तलाठी कार्यालय द्वारे संबंधित पक्षांना नोटीस काढली जाते आणि मंडळ अधिकारी यांच्या मजुरी सह सात बारा उताऱ्यावर नोंदणी घेतल्या जातात .

तीन प्रणाली संलग्र

आय सरिता , ई- फेरफार आणि शहरी भागातील ई -पीसीआयसी या तीन प्रणाली एकत्र करून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सातबारा (Satbara Utara) उताऱ्यावर फेरफार नोंदणी घेण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे . या तीन प्रणालीएकत्रित केल्यामुळे ही प्रक्रिया सोपी व जलद बनली आहे .आता नागरिकांना कार्यालयामध्ये वेळ घालण्याची किंवा फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही .Satbara Utara

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

या प्रणालीचा मुख्य उद्देश काय?

या प्रणालीचा मुख्य उद्देश म्हणजे नोंदणी प्रक्रियेमध्ये विलंब न करता जलत गतीने आणि नागरिकांसाठी प्रक्रियेची पारदर्शकता वाढवणे हा आहे .आता एकाच क्लिकवर नोंदी होणार आहे .यामुळे नागरिकांना कित्येक तास कोणत्या कार्यालयामध्ये बसण्याची वेळ पडणार नाही व अनेक फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाहीआणि त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील .

त्यामुळे,सातबारा उताऱ्यावर नोंदणी घेण्याची प्रक्रिया आता कधीच किचकट आणि त्रासदायक होणार नाही. Satbara Utara

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

Leave a comment