School Bus Rules :नव्या शैक्षणिक वर्षापासून खाजगी शाळा बसेससाठी नवीन नियम लागू; काय आहेत नवीन नियम घ्या जाणून…

School Bus Rules : महाराष्ट्र परिवहन विभागाने खाजगी शाळा बसांसाठी कडक सुरक्षा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . हा निर्णय नव्या शैक्षणिक वर्षापासूनलागू करण्यात येणार आहे .

महाराष्ट्रातील विविध शाळा आणि खाजगी बस ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीबाबत मुलांच्या पालकाकडून मोठ्या संख्येने तक्रारी आल्या होत्या .त्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही ठोस पावले उचलले आहेत .पुढील शैक्षणिक वर्षापासून खाजगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत .जे या नियमाचे पालन करणार नाहीत अशा स्कूल (School Bus Rules) बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे . तर मग आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया काय नियम आहेत …

School Bus Rules

School Bus Rules काय आहेत नियम

स्कूल बसेससाठी खडक सुरक्षा नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ,हे नियम नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू होतील या नियमांतर्गत शाळा बसांमध्ये पॅनिक बटन ,आग विजवणारे स्प्रिंकलर , जीपीएस ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक असणार आहे .तसेच,ज्यांना पालकाकडून परिवहन शुल्क मिळतो,अशा शाळा किंवा बस ऑपरेटरांना बसांच्या निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय कृत सीसीटीव्ही प्रणाली बसवावी लागेल .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

हे वाचा : कापसाचे भाव कमी होण्याचे कारण? जाणून घ्या सविस्तर…

शाळा बसेसच्या सुरक्षा बाबत वाढती चिंता

शाळा बस मध्ये निष्काळजीपणा, ओव्हरलोडिंग ,सुरक्षा नियमाचे पालन न करणे आणि ड्रायव्हरची निष्काळजीपणा या कारणामुळे आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.वारंवार पालकाच्या तक्रारी आल्यामुळे आणि वाढत्या अपघातामुळे परिवहन विभागाने हे कठोर (School Bus Rules) नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियम तयार करण्यासाठी विशेष समितीची स्थापना

नियम तयार करण्यासाठी,सेवानिवृत्ती परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीला एक महिन्याच्या आत मध्ये आपली शिफारसी सादर करण्याचे आदेश देण्यात आली आहे .

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

परिवहन मंत्र्याचे विधान

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,आम्ही पालकाची चिंता लक्षात घेऊन हे नियम लागू केले जात आहेत.नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार,शाळा किंवा बस ऑपरेटर यांना केंद्रीय कृत सीसीटीव्ही प्रणाली बसवावी लागेल .
तसेच नवीन नियम लागू झाल्यानंतर,सर्व शाळा आणि बस ऑपरेटराणा हे सुरक्षा उपाय अमलात आणावे लागतील . अन जो कुणी या नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल .

विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची

यामागचा (School Bus Rules) मुख्य उद्देश म्हणजे शाळा बस मध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे . सरकारला असा विश्वास आहे की, या उपायामुळे शाळेत जाणाऱ्या सर्व मुला मुलींची यात्रा सुरक्षित होईल .

सरकारच्या या नवीन नियमामुळे काय बदल होतील?

पॅनिक बटन : आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी उपयोगी पडेल .
आग विझवणारे स्प्रिंकलर : आग लागल्यास त्वरित नियंत्रणासाठी उपयोगी पडेल .
जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम : बसचे थेट लोकेशन पाण्यासाठी .
सीसीटीव्ही कॅमेरे : विद्यार्थी आणि बस स्टाफच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी .

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

नियमाचे पालन न करणाऱ्या वर कारवाई

नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल .सरकारच्या या निर्णयामुळे बसांची लोकेशन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची माहिती पालकांना मिळेल .
या नवीन नियमामुळे शाळा बस सेवा अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित होईल,त्यामुळे पालकांना चिंता करण्याची गरज पडणार नाही पालक आपल्या मुलांना सुरक्षितपणे शाळेत पाठवू शकतील . School Bus Rules

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment