मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना
मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. काही काही गावांमध्ये नागरिकांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते . तर आपण आज अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेविषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . तसेच लागणारे आवश्यक कागदपत्रे, योजनेची पात्रता, योजनेच्या अटी व नियम, अर्ज कसा करायचा या विषयी सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
सध्याच्या काळामध्ये आपण बघतच आहोत की, शेतामध्ये मनुष्यबळापेक्षा यांत्रिकीकरणाचा उपयोग जास्त होत चाललेला आहे. सध्या कोणतेही काम करायचे म्हटले तर मनुष्यबळ आणि लागणारे मजूर याची कमतरता असल्यामुळे यांत्रिकरणाचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे.
जसे की नांगरणे, पेरणी करणे, कापणी, मळणी इतर सर्व कामे यंत्राच्या साह्याने केली जातात हे यंत्र आपल्या शेतापर्यंत नेण्यासाठी आणि तसेच,
शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये निर्माण केलेल्या शेतीमाल शेतकऱ्यांच्या जमिनीपासून ते शहरांमध्ये घेऊन जाता यावा हा शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे
शेतकऱ्यांना शेतीमाल शहरांमध्ये नेण्यासाठी शेत रस्ता खूप गरजेचा आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने एक योजना आणली त्या योजनेचे नाव आहे मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना अमलात आणली.
या अगोदरही शासन निर्णय द्वारे वेगवेगळया योजना राबवल्या गेल्या होत्या . पण मात्र या योजनेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या रस्त्याची गुंतवणूक निश्चित केलेली नसल्यामुळे बऱ्याच गावांमध्ये शेत रस्त्याचे कामे होऊन पण रस्त्याची समस्या अजूनही सुटलेलाच नाही जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास रस्त्याची दशा पुन्हा जशास तशी पाहायला मिळते.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेची उद्दिष्टे
- मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पायी जाणारा रस्ता व गाडी घेऊन जाता येईल असा हक्काचा रस्ता मिळेल.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट होण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक पाऊल आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करणे हा योजनेमागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे .
- मनरेगाच्या अध्यक्षतेखाली तयार होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना असल्याकारणामुळे ग्रामीण भागातील कुशल कामगारांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल.
- हा रस्ता ग्रामपंचायतच्या आधी मध्ये येत असल्यामुळे यामध्ये कोणतेही प्रकारचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता राहणार नाही.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यात येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा उपयोग होऊन मजूर कमी लागेल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास पण मदत होईल.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचे पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे सातबारा असावा आणि जमिनीच्या बांधावर जी मागणी होत आहे त्याचा कच्चा नकाशा अर्जदार व्यक्तीकडे पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जमिनीचा तीन महिन्या अगोदरचे सातबारा पाहिजे.
- अर्जदार व्यक्तीकडे जमिनीच्या रस्त्या सोबतच जवळपास असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पत्ते व त्यांच्या जमिनीचा सर्व तपशील उपलब्ध असावा.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई -मेल आयड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदार व्यक्तीची सातबारा
- अर्जदाराच्या जमिनीचा 8 अ.
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाइन
- महाराष्ट्र जमीन महसूल विभागांमध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अर्ज करता येणार आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार व्यक्तींनी या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
- अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल. सर्व माहिती भरून घेतल्यानंतर आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जोडून घ्यावी लागेल.
- त्यानंतर हा अर्ज आपल्या महसूल विभागात जमा करायचा आहे.
- महसूल विभागांमध्ये तो अर्ज जमा केल्यानंतर त्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि तो अर्ज मान्य करून घेतला जाईल.
- जर अर्जदार व्यक्तीचा अर्ज ग्राही असेल तर तहसीलदाराकडून सर्व चौकशी व जागेची पाहणी केली जाणार आहे.
- अर्जाला मंजुरी दिली जाईल
- पण शेतकऱ्यांना जर हा निर्णय मान्य नसेल तर पुढील सात दिवसाच्या आत त्यांना उपविभागीय अधिकाऱ्याकडे पुन्हा अर्ज करता येईल किंवा दिवाणी न्यायालय देखील शेतकर आपले मान्ये मांडू शकतत.
विचारले जाणारे प्रश्न
1.मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे?
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत कोणत्या क्षेत्रातील रस्त्याची कामे केली जाणार आहेत?
- मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेले कच्चे शेत रस्ते शेतातील पायवाटा , तसेच शेत्रस्ते आणि पायवाटा या अतिक्रमन मुक्त करून पक्या रस्त्यात रूपांतर केले जाईल .
- मातोश्री ग्रामसमृद्ध शेत पाणंद रस्ते योजनेचा अर्ज कसा केला जाऊ शकेल ?
- मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल विभागामध्ये करण्यात येणार आहे.
- मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फायदा काय होणार आहे?
- मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये यांत्रीकरणाचा उपयोग करून मंजूर कमी लागेल व शेतीमध्ये जास्त उत्पन्न होण्यास मदत होईल आणि झालेला मान शहरांमध्ये नेण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही.
निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि अशाच विविध योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटला भेट द्या.
धन्यवाद!