श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
मित्र आणि मैत्रिणींना आपण एक आज नवीन योजना पाहणार आहोत .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला – मुलीच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना 1 मे रोजी 2023 या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.
ही योजना मुला मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून सरकारने श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आलेले आहे.

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना संपूर्ण माहिती
ही योजना एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी राबविण्यात येत आहे. त्यांच्या मुलांना शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. त्याकरिता श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शून्य ते चार टक्के व्याज दराने शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त मुला-मुलींना सरकारी बँकेच्या सहाय्याने कर्ज देण्यात येईल. ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत योजना सुरू करण्यात आलेली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल हा योजनेचा उद्देश आहे.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना उद्देश
या योजनेचा असा उद्देश आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना आर्थिक मदत करणे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी 0 %ते 4% टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येईल असा या योजनेचा उद्देश आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत मिळेल.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना लाख कोणाला मिळणार
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत लाभ 2023 पर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना मिळणार आहे. मग त्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलगा किंवा मुलगी बारावी उत्तीर्ण झालेली असेल पुढील पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना व्याजदर
पाच लाखापर्यंतचे कर्ज 0%व्याजदर
5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज 2% व्याजदर
10 ते 15 लाखापर्यंतचे कर्ज4 % व्याजदर
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना अटी व नियम
- या योजनेसाठी पाच लाख रुपये पर्यंतचे कर्जासाठी जमीनदाराची आवश्यकता सुद्धा नाही.
- सन 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्रता असणार आहे.
- लाभार्थी विद्यार्थिनींना बारावीनंतर कोणतेही शिक्षण घेण्यासाठी या योजनेसाठी पात्रता असतील.
- या कर्जाचा परतफेड कालावधी हा दहा वर्षा का असणार आहे.
- या योजने अंतर्गत जे कर्ज दिले जाणार आहे त्या कर्जाची परतफेड ही नोकरी लागल्यानंतर होईल.
- पाच ते दहा लाख रुपयांच्या कर्जा साठी एक जामीनदार आवश्यक आहे.
- लाभार्थी व्यक्तीच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाख का पर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत मुला व मुलींना 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एका लाखापर्यंतचे पारितोषिक बक्षीस देण्यात येईल.
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू प्रमाणपत्र.
महाराष्ट्रातील कैद्यासाठी जिव्हाळा कर्ज योजना
![]()
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान अर्ज प्रक्रिया
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना पात्रता
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुलगा व मुलगी पात्रता असणार आहे.
- ही योजना 2023 च्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला व मुली साठी आहे.
- योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती – धर्मातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला मुलींसाठी लागू आहे.
- बारावी झाल्यानंतर व्यवसायिक असो किंवा पदवी/पदविका, अभियांत्रिकी असे कोणतेही शिक्षण घेणारी विद्यार्थी या योजनेसाठी पात्रता असेल.
- बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका
एक शेतकरी एक डिपी योजना अर्ज प्रक्रिया
श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना अवश्य लागणारे कागदपत्रे
- लाभार्थ्याची बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.
- आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.
- लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- लाभार्थ्याच्या आईचे आधार कार्ड
- 7/12 उतारा
- शैक्षणिक शुल्क विवरन पत्रक.
- आई व विद्यार्थी चे पॅन कार्ड
- नोकरीवर रुजू झाल्यानंतर बँकेस अवगत करण्याबाबतचे हमीपत्र
नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास अर्ज भरून आपल्या जवळील बँक मध्ये जमा करायचा आहे. अर्जायसोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून आपला अर्ज बँकेत जमा करून घ्यावा.
अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा शैक्षणिक कर्ज योजना.
RTE योजना rte maharashtra अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे,
निष्कर्ष
योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेच्या श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी तसेच पाच ते दहा लाखापर्यंतचे दोन टक्के आणि दहा ते पंधरा लाखापर्यंत ते चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे
या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला या योजनेबद्दल माहिती सांगा जेणेकरून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील मुला-मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना
एक लाखापर्यंत ची व पारितोषिक देखील या योजनेअंतर्गत मिळणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नाही.