Solar Pump : शासनाच्या वतीने मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेखाली धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरली होती. दीड ते दोन महिने झाले, आतापर्यंत सोलार पंपासाठी कंपनी निवडण्याची चॉईस मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत आहे, सोलार पंप मिळणार तरी कधी? 17 हजार शेतकऱ्यांनी 50 कोटी पेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंट केले आहे . तर दुसरीकडे जिल्ह्यातील 62 हजार शेतकरी सोलार पंप कधी मिळणार याची वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांना आश्वासन, पण प्रत्यक्षात काहीच नाही
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दिवसा पुरेशी वीज उपलब्ध व्हावी,यासाठी राबवण्यात आलेली मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही अत्यंत मंद गतीने राबवली जात आहे . शेतकऱ्यांनी पैसे भरून पण तीन महिने झाले तरी पण आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सर्व कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे .
हे वाचा : सोलर पंप अर्ज मंजूर झालाय का? तर तपासू शकतात सोलर पंप अर्जाची स्थिती
धाराशिव जिल्ह्यातील 62 हजार शेतकरी लाभापासून वंचित
दरम्यान,धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 62 हजार शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.यामध्ये महावितरण कंपनीकडून 900 शेतकऱ्याना अप्रूव्हल देण्यात आले तरी प्रत्यक्षात सौर पंप (Solar Pump) बसवण्यासाठी विलंब होत आहे . मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत अगोदर शेतकऱ्यांसाठी मेडा आणि कुसुम या योजनेअंतर्गत सौर पंप दिले जात होते .यामध्ये शेतकऱ्याकडून मोठ्या संख्येने नोंदणी केली होती ;पण नवीन योजना आल्यानंतर जुने सर्व शेतकऱ्यांना नवीन योजनेमध्ये वर्ग केले गेले .
त्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागले . अर्ज केल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून पेमेंट भरण्यासाठी शेतकऱ्यांना ऑप्शन आले . शेतकऱ्यांनी या संबंधित पोर्टलवर पेमेंट केल्यानंतर विभागीय कार्यालाकडून अप्रुव्हल देणत्यात येते . त्यानंतर पुन्हा लाईनमनकडून आयडी तयार केला जातो . नंतर परत विभागीय कार्यालयावर संबंधित अर्ज पाठविला जाते .
त्यानंतर त्यामध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि सौर कृषी पंप पुरवणाऱ्या कंपन्यांना कळविण्यात येते. मात्र योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाले आहे . यावर्षी पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे .रबी लागवड क्षेत्र वाढले आहे.त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन विहिरी खोदल्या आहेत .त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना सौर पंपाची गरज आहे .त्यामुळे मागील त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी साधारण दोन ते तीन महिन्यात अगोदर सोलर पंपासाठी अर्ज भरले होते .Solar Pump
पुरवठादार निवडीचा पर्याय येत नसल्याने शेतकरी नाराज
दरम्यान,निवडणुकीच्या काळात काही दिवस या योजनेचे साईट बंद झाली होती.त्यानंतर महावितरण पोर्टलची साईट सध्या स्थितीत व्यवस्थित सुरू आहे.यामध्ये सोलर कंपनी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे.परंतु पुरवठादार निवडीचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.Solar Pump
पुरवठादार पर्याय फक्त काही वेळेसाठीच होतो उपलब्ध
- शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर महावितरणकडून पुरवठादार निवडण्याचा पर्याय दिला जातो.
- मात्र, फक्त एकच कंपनी निवडण्यासाठी उपलब्ध असते, इतर कंपन्यांचे पर्याय दिसतच नाहीत.
- त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा पर्याय फक्त पाच मिनिटांसाठीच खुला असतो.
- काही वेळातच “कोटा संपला” असा संदेश येतो आणि शेतकरी निवड करू शकत नाहीत.
- त्यामुळे पेमेंट भरले तरी पंप मिळण्याचा प्रश्न अनुत्तरित राहतो.
17हजार शेतकऱ्यांनी भरली 50 कोटी पेक्षा जास्त रक्कम
धाराशिव जिल्ह्यातील मागील त्याला सौर (Solar Pump) कृषी पंप योजनेत पेमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 17000 आहे.या शेतकऱ्यांनी 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम महावितरण कडे भरण्यात आली आहे .शेतकऱ्यांनी महावितरण कडे ही रक्कम भरून दोन ते तीन महीने झाले . तरी पण शेतकऱ्यांना पुरवठा कंपनीची निवड करता येत नाही . त्यामुळे शेतकरी संतापले आहेत . तरीपण महावितरण कडून याचे उत्तर मिळत नाही .
स्क्रुटिनीची गती मंद
सोलर कृषी पंप (Solar Pump) योजनेत अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची वेगवेगळ्या पातळीवर स्क्रुटिनी केली जाते त्याची गती मंद असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील या योजनेला वेग मिळत नसल्या चे दिसते आहे .सध्या 62 हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केल्या आहे.त्यामधील फक्त 12 शेतकऱ्यांच्या अर्जाची स्क्रुटिनी झाली आहे . म्हणजे दिवसाला 1000 अर्जाची पण स्क्रुटिनी होत नाही नाहीत्यामुळे 62 हजार शेतकऱ्यांचा नंबर येण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो .Solar Pump
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि वस्तुस्थिती
मुख्यमंत्री “मागेल त्याला सौर (Solar Pump) कृषी पंप” योजनेबद्दल बोलताना म्हणाले होते की, मागील महिन्यात अर्ज केल्यापासून ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पंप मिळल असे व्यक्त केले होते. परंतु, पण प्रत्यक्षात अर्ज करून एक वर्ष आणि पेमेंट करून तीन महिने उलटूनही एकाही शेतकऱ्याला पंप मिळालेला नाही .महावितरण विभागाकडून या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याची असणारी ही योजना शेतकऱ्यांसाठीच डोकेदुखी बनत आहे .Solar Pump
सौर कृषी पंप योजनेची जिल्ह्यातील कडेवाडी
- आलेले एकूण अर्ज – 61718
- पेमेंट केलेले अर्ज – 17004
- स्क्रुटिनी झालेले अर्ज – 11473
- अप्रूव्हल – 8998
- पुरवठादार कंपनीची निवड – 4714
- पंप बसवलेले – 00