sour krushi pump update : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सौर पंप साठी अनुदान वितरित करतात. या अनुदानाच्या मार्फत शेतकऱ्यांना कमी किमतीत आपल्या शेतात कृषी सौर पंप बसवण्यासाठी सहकार्य मिळते. या योजनेतून बहुतांश शेतकऱ्यांनी सौर पंपाचा लाभ घेतला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये अर्ज देखील केले आहेत. आता यामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी एसएमएस पाठवण्यात आले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेमेंट भरलं नाही त्या शेतकऱ्यांना अंतिम तारखेपर्यंत पर्यंत पेमेंट भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्या शेतकऱ्यांची नाव रद्द करून दुसरे शेतकरी त्या ठिकाणी निवडले जातील.
ज्या शेतकऱ्यांना सौर कृषि पंप निवड झाल्याचे एसएमएस आले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी अजून पर्यन्त पैसे भरले नाहीत अश्या शेतकऱ्यांना ही शेवटची संधि देण्यात येत आहे. जर शेतकऱ्यांनी पेमेंट नाही केले तर त्या शेतकऱ्यांच्या जागी दुसरे शेतकरी निवडले जातील.
कधी पर्यंत करता येणार पेमेंट.
ज्या शेतकऱ्यांना कृषि सौर पंप अंतर्गत पेमेंटचे ऑप्शन आले आहेत. त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले पेमेंट भरून घ्यावे .कारण येत्या 24 ऑक्टोबर नंतर त्या शेतकऱ्यांना परत पेमेंट करता येणार नाही किंवा 24 ऑक्टोंबर ही पेमेंट करण्याची अंतिम तारीख करण्यात आली आहे. जे शेतकरी 24 ऑक्टोबर पर्यंत पेमेंट करणार नाही त्या शेतकऱ्यांच्या जागी दुसऱ्या शेतकऱ्यांची नेमणूक करून त्यांना एसएमएस पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून दिली आहे.
कसे करावे लागणार पेमेंट
ज्या शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी एसएमएस आले आहेत त्या शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या अॅप वरून आपला सेल्फ सर्वे करून घेणे आवश्यक आहे. सेल्फ सर्वे पूर्ण केल्यानंतर आपल्याला प्रोसेस टू पेमेंटचा पर्याय दिसून येईल. यामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करू शकता किंवा जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यास काही अडचण निर्माण होत असेल तर जवळील महाऊर्जाच्या कार्यालयात जाऊन देखील आपण आपलं पेमेंट भरू शकता.
किती करावे लागणार पेमेंट.
सौर पंप अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्वयंशाची रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आणि कोणत्या पंपासाठी किती रक्कम ठेवण्यात आली आहे याबद्दलची माहिती आपण पाहूयात.
हे वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती
सर्वसाधारण घटकासाठी
- तीन एचपी पंप – 16560
- पाच एचपी पंप – 24710
- साडेसात एचपी पंप – 33455
अनुसूचित जाती जमातीसाठी
- तीन एचपी पंप – 8280
- पाच एचपी पंप – 12355
- साडेसात एचपी पंप – 16728
sour krushi pump update पेमेंट नंतर पुढील प्रक्रिया काय
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा जवळील महाऊर्जा कार्यालयात जाऊन पेमेंट पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पंप सिलेक्शन साठी पर्याय दिला जातो व्यापाऱ्याच्या माध्यमातून आपणास हवे असणारी वेंडर म्हणजेच कंपनी आपण निवडू शकता या कंपनीच्या माध्यमातून आपली पुढील प्रक्रिया राबवून आपल्या शेतात आपला सौर कृषी पंप बसवण्यात येतो.
पेमेंट नाही केल्यास काय होणार.
ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येऊन देखील त्यांनी अजून पेमेंट केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी जर पेमेंट नाही केले तर त्या शेतकऱ्यांची नावे यादी मधून वगळण्यात येतील व त्या ठिकाणी नवीन शेतकऱ्यांना ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना संधी देण्यात येईल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपला सेल्फ सर्वे आणि आपले पेमेंट पूर्ण करून घ्यावे अन्यथा आपल्या जागी नवीन शेत शेतकऱ्यांना संधी देण्यात येईल.