soyabean hamibhav nondani शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय यंत्रणेद्वारे खरेदी केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकाची खरेदी केली जाते.
हमीभावाने पिकाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असते. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कधी विकायचं याबाबतचे अपडेट दिले जाते. त्यानुसार शेतकरी आपले पीक शासकीय खरेदी केंद्रावर घेऊन जातात.
हमीभाव आणि शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी करण्यासाठी ही समृद्धी पोर्टल शासनाकडून तयार करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री त्यांना दिलेल्या तारखेवर आणि वेळेवर करू शकतात.
हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार
ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना याआधी 31 डिसेंबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अडचणी निर्माण होत होत्या. तसेच संकेतस्थळाच्या अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपली नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आता शासनाकडून शेतकऱ्यांना हमीभावाने पिकाची विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
soyabean hamibhav nondani कधी पर्यंत मिळाली मुदतवाढ
soyabean hamibhav nondani शेतकऱ्यांना आपल्या पिकाची हमीभावाने विक्री करण्यासाठी याआधी 31 डिसेंबर 2024 ही तारीख दिली होती. परंतु आता शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी करण्यासाठी 06 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपली नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी 06 जानेवारी 2025 पूर्वी आपली नोंदणी इ समृद्धी पोर्टलवर करणे बंधनकारक आहे.