Pik Vima: पीक विमा मंजूर, पण खात्यात पैसे आले नाहीत; शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत.
Pik Vima : नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मंजूर झालेली नुकसानभरपाईची रक्कम वेळेवर मिळत नाहीये, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हजारो शेतकरी मंजूर झालेल्या पीक विम्याच्या रकमेच्या …