union budget 2024
union budget 2024 : केंद्र सरकार ने आर्थिक वर्ष 2024 -2025 चा अर्थसंकल्प दिनांक 23 जुलै 2024 रोजी सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यांनी अर्थसंकल्पात विविध क्षेत्रा साठी घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातुन सर्वसाधारण व्यक्तीच्या संबंधी कुठला बोजा पडला आहे यासाठी सर्वच जन उत्सुक असतात. सरकार कडून अनेक कस्टम ड्यूटी वरील दर कमी केले आहेत. त्यात मुख्य म्हणजे कॅन्सर औषधावरील शुल्क पूर्ण पणे माफ करण्यात आले आहे.
सोन्याच्या भावात 1000 रुपये वाढ
नव उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज योजना
union budget 2024 या गोष्टी स्वस्त
- सोने – चांदी खरेदी
- कॅन्सर वरील औषधी
- मोबाइल , चार्जर
- चमड्यां पासून बनवलेल्या वस्तु
- रसायन पेट्रोकेमिकल
- PVC फ्लेक्स बॅनर
- एक्सरे सेल आणि पॅनल उत्पादक वस्तु
union budget 2024 आणखी काय नवीन घोषणा
1 कोटी युवकांना दर महिना 5 हजार भत्ता
देशातील टॉप कंपण्यामद्धे युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्या प्रशिक्षण युवकांना प्रती महिना 5 हजार रुपये भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही इंटर्नशिप योजना 12 महिन्या पर्यंत असेल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संगीतले.
मुद्रा योजनेअंतर्गत आता 20 लाख रुपये पर्यंत कर्ज
देशातील युवकांना स्वयं रोजगारासाठी मुद्रा योजना राबवली जाते या योजनेमध्ये आता 10 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे कर्ज व्यवसायिकाला सहज आणि अल्प व्याज दरात मिळते. जर ज्या तरुणांनी आधी घेतलेले कर्ज व्यवस्थित फेडले असेल तर अश्या तरुणांना आता नव्याने दुप्पट कर्ज देण्यात येणार आहे.