Update Aadhar card आधार कार्डात मोफत बदल करण्याची संधी सरकारने दिली आहे, जी आता संपण्याच्या मार्गावर आहे. आधारमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासाठी तुमच्याकडे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत ,नंतर तुमला आधारमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. १४ डिसेंबर २०२४ ही आधार कार्ड अपडेट करुन घेण्यासाठी अंतिम तारीख आहे . १४ डिसेंबर पर्यंत नागरिकान आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. त्यानंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा .
Update Aadhar card आधार कार्डाचे महत्त्व
Update Aadhar card आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी एक प्रमुख ओळखपत्र बनले आहे. शासकीय योजना, बँक खाते, पासपोर्टसाठी अर्ज किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी आधार कार्ड आवश्यक असते. जन्मानंतर ते मृत्यपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड जवळपास बंधनकारक आहे. यावरुन आपल्याला आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. त्यामुळे आधार माहिती नेहमी अचूक आणि अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
कोणता बदल मोफत करता येईल?
आधार कार्डावर पुढील गोष्टी मोफत अपडेट करता येतील:
- नावात बदल
- पत्त्यात बदल
- फोटोत बदल
- जन्मतारीख दुरुस्ती
- लिंगाची माहिती सुधारणा
कोणाला अपडेट करणे गरजेचे आहे?
ज्यांनी आधार कार्ड १० वर्षांपूर्वी बनवले आहे, त्यांनी त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपली आधार माहिती अद्ययावत राहील आणि भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
ऑनलाइन बदल कसा कराल?
तुम्हाला घरबसल्या आधार अपडेट करण्यासाठी myAadhaar.uidai.gov.in या वेबसाईटचा वापर करता येईल.
प्रक्रिया:
- वेबसाईटवर लॉगिन करा (ओटीपीद्वारे).
- प्रोफाईल टॅबवर क्लिक करा आणि हवे असलेले बदल निवडा.
- आवश्यक ओळखपत्र (पीडीएफ, पीएनजी किंवा जेपीईजी स्वरूपात) अपलोड करा.
- साईज २ एमबीपेक्षा कमी असायला हवी.
ऑफलाइन बदलासाठी केंद्रांचा वापर
Update Aadhar card कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील आधार माहिती अपडेट करता येते. आवश्यक कागदपत्रे:
- शिधापत्रिका
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- इतर वैध सरकारी ओळखपत्र
मुदतीनंतर काय होईल?
१४ डिसेंबरनंतर आधार अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आजच आपला आधार कार्ड अपडेट करावा.
हे वाचा: शेतकऱ्यांनो, सौर पंप योजनेसाठी अर्ज करताना ही काळजी घ्या.
निष्कर्ष
आधार कार्ड अद्ययावत ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. आजच ऑनलाइन किंवा नजिकच्या केंद्रामध्ये जाऊन अपडेट प्रक्रिया पूर्ण करा आणि विनामूल्य सेवा घेण्याचा लाभ घ्या!